RR vs GT, IPL 2022 Final : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पण तत्पूर्वी याच ठिकाणी आयपीएल 2022 चा समारोप सोहळा अर्थात क्लोजिंग सेरेमनी (IPL 2022 Closing Ceremony) आयोजीत कऱण्यात आली आहे. या कार्यक्रमाला बॉलीवुड सेलिब्रिटींपासून ते अनेक दमदार आर्टिस्ट कार्यक्रम सादर करणार असून या कार्यक्रमाबद्दलचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगणार आहोत...
1. कधी आणि कुठे पाहाल IPL 2022 ची क्लोजिंग सेरेमनी?
हा कार्यक्रम आज सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटंनी सुरु होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर ही सेरेमनी लाईव्ह पाहता येईल. तर डिज्नी+हॉट स्टार अॅपवर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
2. कोण-कोणते सेलिब्रिटी मैदानात अवतरणार?
ऑस्कर विजेते म्यूझिक कंपोजर ए.आर. रेहमान आणि बॉलीवुड सुपरस्टार रणवीर सिंह या क्लोजिंग सेरेमनीचं मुख्य आकर्षण असणरा आहे. रेहमान आणि नीती मोहन यांचा रिहर्सल करतानाचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यामुळे नीती मोहन तसंच मोहित चौहान यांचाही परफॉरमन्स याठिकाणी असेल. बॉलीवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील डान्स करताना दिसेल. विशेष म्हणजे सेलिब्रिटी आणि सर्व कलाकार मिळून 700 कलाकार या इव्हेंटमध्ये परफॉर्म करतील.
3. क्लोजिंग सेरेमनीची थीम काय असेल?
आयपीएल क्लोजिंग सेरेमनीची थीम ही भारताच्या 75 व्या स्वांतत्र्याचा महोत्सवाची असणार आहे. आयपीएलचं (IPL 2022) यंदाचं 15 वं वर्ष आहे. मागील 8 दशकात भारतीय क्रिकेटनं आयपीएलमुळे खूप प्रसिद्धी मिळवली आहे.
4. गेस्ट लिस्टमध्ये कोण-कोण?
आयपीएल 2022 च्या समारोप सोहळ्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्यासह उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सामन्याला गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि राज्यातील काही राजकीय व्यक्ती देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील गुजरातमध्येच असल्याने ते देखील कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-