Who Pays Fine In IPL : लखनौ आणि आरसीबी यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान खेळाडूमध्ये बाचाबाची झाली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला होता. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना सामन्यानंतर प्रत्येकी 100-100 टक्के दंड ठोठावण्यात आलाय. तर नवीन उल हक याला ५० टक्के दंड लगावला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये षटकांची गती न राखल्यामुळे कर्णधारांना आर्थिक दंड झाला आहे. आर्थिक दंडाची रक्कम कोण भरते? याची संपूर्ण प्रोसेस काय आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  


आरसीबी आणि लखनौ यांच्यातील वादावरुन याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात... सर्वात आधी विराट कोहलीला झालेल्या दंडाबाबत समजून घेऊयात. विराट कोहली आरसीबीच्या संघातील महत्वाचा सदस्य आहे.  आयपीएलमध्ये खेळाडूंना लावण्यात आलेली दंडाची रक्कम आरसीबीचा संघ चुकवतो. त्याशिवाय नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांना झालेला दंड लखनौचा संघ चुकवले. क्रिकबजच्या एका रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती समोर आली. खेळाडू मैदानावर जे काही करतात ते संघासाठी करतात. त्यामुळे फ्रेंचायझी खेळाडूंवर बर्डन देत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना लावण्यात आलेला दंड फ्रेंचायझी स्वत: भरते. 


वेगवेगळ्या फ्रेंचायझीचे दंड भरण्याचे नियम वेगवेगळे असू शकतात. पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक फ्रेंचायझीने आपल्या खेळाडूंचा दंड स्वत भरला आहे.  म्हणजेच खेळाडूंवर कोणताही आर्थिक बोज येऊ दिला जात नाही.  दरम्यान, प्रत्येक खेळाडू, कर्णधार प्रतिस्पर्धी संघाच्य खेळाडूसोबत भिडत असतो, तेव्हा आपल्या संघासाठी तो जिवाचे रान करत असतो. त्यामुळेच खेळाडूंना झालेला दंड फ्रेंचायझी भरत असते. 


दंड कसा भरला जातो ? प्रोसेस काय आहे?
प्रत्येक हंगामाच्या अखेरीस बीसीसीआयकडून प्रत्येक संघाला एक इनवॉइस पाठवले जाते. त्यामध्ये फ्रेंचायझीमधील खेळाडूंना लावण्यात आलेल्या दंडाची एकूण रक्कम असते. फ्रेंचायझी ती इनवॉइस खेळाडूंनाही पाठवू शकते, तो निर्णय त्यांचा असतो. पण संघ खेळाडूवर बर्डन येऊ नये, म्हणून रक्कम स्वत भरली जाते.  
 
कोणत्या आधारावर सामन्याची फीस ठरवली जाते - 


यासाठीही विराट कोहलीचेच उदाहरण पाहूयात. विराट कोहलीला एका हंगामासाठी १५ कोटी रुपयांचे मानधन मिळते. जर  RCB प्लेऑफमध्ये नाही पोहचला तर विराट कोहली  14 सामने खेळतो.  म्हणजेच विराट कोहली प्रत्येक सामन्याला 1.07 कोटी रुपये फीस घेतो. 


 जर RCB फायनलपर्यंत पोहचले तर त्यानुसार एकूण सामने आणि एकूण रक्कम यातून सामन्याची फीस ठरवली जाते. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर आर्थिक दंडाची रक्कम ठरवली जाते. त्यानुसार फ्रेंचायझीला इनवॉइस पाठवले जाते.