Shreyas Iyer IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Punjab Kings) पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. क्वालिफायर-2 च्या सामन्यात पंजाब किंग्सने 5 विकेट्सने विजय मिळवत तब्बल 11 वर्षांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात एन्ट्री मारली. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 41 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी करून पंजाबच्या ऐतिहासिक विजयात मोठे योगदान दिले. संपूर्ण सामन्यात श्रेयस अय्यर शांत, संयमी दिसून आला. 

Continues below advertisement


अंतिम फेरीत प्रवेश करताच श्रेयस अय्यर काय म्हणाला?


पंजाब किंग्जसमोर 204 धावांचे लक्ष्य होते. त्यानंतरही श्रेयस अय्यरने धावांचा पाठलाग करताना स्वतःला शांत ठेवले. यावर तो म्हणाला, 'खरं सांगायचं तर, मी इतका शांत कसा राहू शकतो हे मला कळत नाही. पण मी नेहमीच म्हणतो की जितका मोठा प्रसंग येईल तितका तुम्ही शांत असले पाहिजे, असं श्रेयस अय्यरने सांगितले. तसेच आरसीबीविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सचा संघ फक्त 101 धावांवर ऑलआउट झाला होता. यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही त्या पराभवाबद्दल जास्त विचार केला नाही. आमच्या संघाने संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली आहे. एक सामना आमच्या संघाची व्याख्या करू शकत नाही. आम्ही त्याबद्दल जास्त विचार केला नाही. आम्ही सुरुवातीपासूनच सकारात्मक आणि आक्रमक क्रिकेट खेळत आहोत. केलेल्या चुका विसरून पुढे जाणे महत्त्वाचे आहे, असं श्रेयस अय्यर म्हणाला. तसेच काम अद्याप संपलेलं नाही, असा इशारा देखील श्रेयस अय्यरने आरसीबीविरुद्धच्या सामन्याआधी दिला आहे. 










क्वालिफायर-1 मध्ये पराभव झाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या विधानाची रंगलेली चर्चा-


क्वालिफायर-1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध पराभव झाल्यानंतर श्रेयस अय्यरने केलेल्या विधानाची चर्चा रंगली होती. लढाई हरलो, पण युद्ध नाही, अशा शब्दांत श्रेयस अय्यरने आत्मविश्वास व्यक्त केला होता आणि हाच आत्मविश्वास त्याने खरा करुन दाखवला.


आयपीएलला नवा विजेता मिळणार-


3 जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब संघात विजेतेपदासाठी लढत होईल. महत्वाचं म्हणजे आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात या दोन्ही संघानी ही स्पर्धा एकदाही जिंकलेली नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात पंजाब किंवा बंगळुरुच्या रुपानं आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे.


संबंधित बातमी:


PBKS vs MI IPL 2025: नेहाल वढेराचा आधी झेल सोडला, मग 17 व्या षटकांत पंजाबने धू धू धुतला, मुंबईचा 'हा' खेळाडू व्हिलन ठरला!


Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!