IPL 2025 Rishabh Pant And Kuldeep Yadav: लखनौ सुपर जायट्सने दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals vs Lucknow Super Giants) एक विकेट्सने विजय मिळवला. तब्बल 209 धावा उभारल्यानंतर दिल्लीची 5 बाद 65 अशी अवस्था केली. मात्र दिल्लीकडून आशुतोष शर्मा आणि विप्राज निगमने लखनौच्या तोंडातील विजय हिसकावून घेतला.

तब्बल 209 धावा उभारल्यानंतर दिल्लीची 5 बाद 65 अशी अवस्था केली. आशुतोष शर्माचे तडाखेबंद नाबाद अर्धशतक आणि विप्राज निगमचा निर्णायक अष्टपैलू खेळ दिल्लीसाठी मोलाचा ठरला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लखनौने 20 षटकांत 8 बाद 209 धावा उभारल्या. हे आव्हान दिल्लीने 19.3 षटकांतच 9 बाद 211 धावा करून पार केले. या सामनादरम्यानचा लखनौचा कर्णधार ऋषभ पंत आणि दिल्लीचा गोलंदाज कुलदीप यादवचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऋषभ पंतची कुलदीप यादवसोबत मस्ती, VIDEO:

कुलदीप यादव फलंदाजीसाठी मैदानात आला होता. यावेळी ऋषभ पंतने पहिले कुलदीप यादवला क्रीजबाहेर ढकलले आणि नंतर त्याला स्टंपआऊटही केले. मात्र हे सर्व मस्तीत सुरु होते. परंतु दोघांच्या या कृतीकडे मैदानातील अंपायरही पाहत बसले होते. दरम्यान,ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यातील मैत्री कोणापासूनही लपलेली नाही. अनेकवेळा दोघंही एकमेकांची मस्ती करताना मैदानात दिसून येतात. 

लखनौकडून मार्श आणि पूरनची आक्रमक खेळी-

लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली. एडन मार्क्रम लवकर बाद झाल्यानंतरही, मिचेल मार्श (72) आणि निकोलस पूरन (75) यांनी दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतले. दोघांनीही फक्त 42 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, मार्शने 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 36 चेंडूत 72 धावा करून बाद झाला. तर पूरनने 24 चेंडूत अर्धशतक ठोकले. 30 चेंडूत 75 धावा करून पूरन अखेर बाद झाला. यादरम्यान, पूरनने त्याच षटकात सलग 4 षटकार आणि 1 चौकारही मारला.

संबंधित बातमी:

IPL DC vs LSG Ashutosh Sharma: कपडे धुण्यापासून ते अंपायरिंग, पडेल ते काम केलं; लखनौच्या तोंडातील विजयाचा घास हिरावणारा आशुतोष शर्मा कोण?

IPL 2025 Ishan Kishan SRH vs RR: तुम्हाला माझ्याकडून काय हवंय?; लिलावानंतर एक फोन कॉल अन् इशान किशनच्या आयुष्यात यूटर्न, शतक ठोकताच सर्व सांगितलं!