IPL 2025 Mumbai Indians vs Lucknow Super Giants: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) 12 धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत 203 धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबईला शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या रोमांचक सामन्यात फक्त 191 धावा करता आल्या आणि मुंबईला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले. तर लखनौकडून मिचेल मार्शने आक्रमक खेळी केली. 

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध तिलक वर्माने खूप हळू फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली फलंदाजी केली पण इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या तिलक वर्माच्या संथ खेळीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. तिलक वर्माने 23 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर संघाने त्याला रिटायर्ड आउट केले. 19 व्या षटकात तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला. तिलक वर्माच्या जागी आलेल्या मिचेल सँटनरला दोन चेंडूत फक्त दोन धावा करता आल्या. त्यामुळे तिलक वर्माला माघारी बोलवण्याचा निर्णय अनेकांना आवडला नाही. मात्र सामना संपल्यावर लगेच हार्दिक पांड्याने या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. 

तुम्ही प्रयत्न करता पण यश मिळत नाही- हार्दिक पांड्या

अखेरच्या क्षणी संघाला मोठे फटके हवे होते. तिलक वर्माला ते खेळता येत नव्हते. क्रिकेटमध्ये काही दिवस असे येतात, जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण यश मिळत नाही, असं हार्दिक पांड्याने सांगितले. 

शार्दुल ठाकूरच्या षटकाने सामना उलटला-

मुंबई इंडियन्सना शेवटच्या 2 षटकांत जिंकण्यासाठी 29 धावा करायच्या होत्या. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा क्रीजवर उपस्थित होते. दोघांच्या नेतृत्वाखाली, 29 धावांचे हे लक्ष्य गाठणे पूर्णपणे शक्य वाटत होते. मात्र लखनौकडून 19 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने सामना फिरवला. शार्दुल ठाकूरने 19 व्या षटकांत फक्त 7 धावा दिल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत मुंबईला विजयासाठी 21 धावांची गरज होती. लखनौकडून शेवटचे षटक आवेश खानने टाकले. आवेश खानच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याला षटकार टोलावला. मात्र पुढच्याच चेंडूंवर त्याने जोरदार पुनरागमन केले आणि लखनौचा 12 धावांनी विजय निश्चित केला.

संबंधित बातमी:

IPL 2025 Hardik Pandya: कर्णधार हार्दिक पांड्या नव्हे, मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी 'हा' खेळाडू जबाबदार; काय घडलं?