Lucknow Super Giants vs Mumbai Indians : आयपीएल 2025 च्या 16 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. 203 धावा केल्यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली आणि संघाला हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सला तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण लखनौच्या गोलंदाजांवर मात करू शकले नाहीत. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांना 20 षटकांत 5 बाद 191 धावाच करता आल्या.

सामना सपल्यानंतर हार्दिक पांड्या काय म्हणाला?  

हरल्यानंतर निराशा होते. पण खरं सांगायचं तर, आम्ही 10-12 धावा जास्त दिल्या आणि शेवटी आम्ही कमी पडलो. आणि माझी गोलंदाजीबद्दल बोलयचं झाले तर, मला नेहमीच आवडते. माझ्याकडे जास्त पर्याय नाहीत, पण मी खेळपट्टी अभ्यास करतो आणि हुशारीचे पर्याय वापरतो. मी कधीही विकेट्ससाठी जात नाही, पण फलंदाजांना चूक करायला लावण्याचा प्रयत्न करतो. आज असाच एक दिवस होता. फलंदाजी युनिट म्हणून आम्ही कमी पडलो. आम्ही संघ म्हणून जिंकतो, संघ म्हणून हरतो. मी पूर्ण जबाबदारी घेतो.

तिलक वर्मा कर्णधार पांड्या काय म्हणाला?

आम्हाला काही मोठे फटके हवे होते, ते त्याला मिळत नव्हते. क्रिकेटमध्ये काही दिवस असे येतात, जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण यश येत नाहीत.

हार्दिक पांड्याने इतिहास रचला

हार्दिक पांड्याने इतिहास रचला आहे. त्याने त्याच्या 10 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकने त्याच्या 140 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 72 विकेट्स घेतल्या आहेत. लखनौविरुद्धच्या सामन्यात त्याने एडन मार्क्रम, निकोलस पूरन, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर आणि आकाशदीप यांच्या विकेट घेतल्या. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.