IPL 2024 Travis Head SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) काल झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 1 धावाने पराभव केला. हैदराबादने 20 षटकांत 3 बाद 201 धावा केल्यानंतर राजस्थानला 20 षटकांत 7 बाद 200 धावांवर रोखले.


शानदार फॉर्ममध्ये असलेला सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने 44 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील त्याची ही चौथी अर्धशतकी खेळी होती. या डावात हेडने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. हेड फलंदाजी करत असताना एक वाद निर्माण झाला. यामुळे मैदानावरील वातावरण काही काळ तणावाचे झाले होते.


नेमकं काय घडलं?


आवेश खानच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिड हेड फटका मारण्यासाठी पुढे गेला, परंतु चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हाती विसावला. संजूने चतुराईने रन आऊट केले. पण, तिसऱ्या अम्पायरने हेडला नाबाद दिले. रिप्लेमध्ये चेंडू जेव्हा स्टम्पवर आदळला तेव्हा हेडची बॅट किंचीत हवेत होती. तरीही त्याला नाबाद दिले. डगआऊटमध्ये बसलेला राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शक कुमार संगकाराने पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली, या निर्णयाचा निषेध केला जात होता, मात्र पुढच्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज आवेश खानने हेडला बाद करत बदला पूर्ण केला.


पाहा व्हिडीओ-






इरफान पठाण काय म्हणाला?






तिसऱ्या अम्पायरने पुन्हा भयानक निर्णय, अजून दोन अँगलच्या फ्रेमने तपासायला हवे होते. हेडची बॅट हवेत होती, असं भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणाने सांगितले. 


हैदराबादने 201 धावा केल्या-


राजस्थानविरुद्ध हैदराबादने 201 धावा केल्या. भारताच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळवणारा युझवेंद्र चहलला हैदराबादच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले. त्याने चार षटकांत 62 धावा दिल्या.नितीश कुमार रेड्डीने 42 चेंडूत आठ षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद 76 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. हेडसह तिसऱ्या विकेटसाठी 96 धावा जोडण्याबरोबरच हेन्रिक क्लासेन (19 चेंडूत नाबाद 42, तीन षटकार, तीन चौकार) सोबत चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारीही केली.


संबंधित बातम्या:


Rinku Singh: ती एक चूक महागात पडली; रिंकू सिंहला भारतीय संघात स्थान न मिळण्यास कोलकाता नाइट रायडर्स जबाबदार?


विश्वचषकासाठी बुमराहला उपकर्णधार बनवा; इरफान पांड्याच्या हात धुवून मागे लागला, आता काय म्हणाला?


 मिशेलने दोन धावा काढल्या, पण धोनी जागच्या जागी राहिला; शेवटच्या षटकात मोठा ड्रामा, पाहा Video