Surya Kumar Yadav Fitness Update : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सूर्यकुमार यादव यानं नेटमध्ये सरावाला सुरुवात केली. सूर्यकुमार यादव सर्जरीनंतर क्रिकेटच्या मैदानात कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. सूर्यकुमार यादव यानं नेट्समध्ये कसून सराव केला. सूर्या मैदानावर परतल्यामुळे मुंबईने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. त्याशिवाय मुंबईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण असेल. सूर्यकुमार यादव महिन्यभरापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव आयपीएलएला मुकणार की काय अशा चर्चा रंगल्या होत्या. सूर्यकुमार याच्या घोट्यावर जर्मनीमध्ये सर्जरी करण्यात आली. त्यानंतर तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून नेटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामाला अवघ्या तीन आठवड्याचा कालावधी राहिलाय. 22 मार्चपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. आयपीएलच्या या हंगामात मुंबईचा पहिला सामना गुजरात संघासोबत होणार आहे. या सामन्याआधी आता सूर्यकुमार यादव तंदुरुस्त झाला. त्यामुळे फलंदाजीत मुंबईची ताकद नक्कीच वाढली असेल. सूर्यकुमार यादव टी 20 क्रिकेटध्ये हुकमी एक्का आहे. मुंबईसाठी त्याने अनेकदा विजयी खेळी केली आहे. सूर्या परतल्यामुळे मुंबईची ताकद वाढली आहे.
मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम T20I सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. घोट्याच्या दुखापतीमुळे काही दिवसांपासून क्रिकेटला मुकला होता. गेल्या महिन्यात त्याच्या घोट्यावर जर्मनीमध्ये यशस्वी शस्त्रक्रियाही झाली. 33 वर्षीय स्कायने आता एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन सुरु केले असून नेट्समध्ये सरावाला सुरुवात केली आहे. सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय, त्यामध्ये तो नेट्समध्ये सराव करताना दिसत आहे. सूर्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई -
मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात आपल्या नव्या कर्णधारासह मैदनात उतरणार आहे. रोहित शर्माच्या ऐवजी मुंबईने हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार केलंय. हार्दिक पांड्याला मुंबईने गुजरातकडून ट्रेड केले.
मुंबईच्या ताफ्यात कोण कोण ?
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, रोमॅरियो शेफर्ड, शम्स शेफर्ड, नेहल वढेरा, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी.