बंगळुरु : आयपीएलमध्ये (IPL 2024)कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengalur) यांच्यात दहावा सामना पार पडला. या मॅचमध्ये केकेआरनं (KKR) आरसीबीवर (RCB) 7 विकेटनं दणदणीत विजय मिळवला. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 बाद 182 धावा केल्या होत्या. आरसीबीकडून सर्वाधिक धावा विराट कोहलीनं केल्या. विराटनं 83 धावांची खेळी केली. केकेआरच्या फलदाजांच्या दमदार कामगिरीमुळं त्यांनी मॅच 19 व्या ओव्हरमध्येच जिंकली. केकेआरला फिलीप सॉल्ट आणि सुनील नरेननं ( Sunil Narine) चांगली सुरुवात करुन दिली होती. 


केकेआरनं यंदाच्या आयपीएलमध्ये  सुनील नरेनला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील नरेन आणि फिलीप सॉल्ट केकेआरच्या डावाची सुरुवात करत आहेत. केकेआरसाठी हा निर्णय फायदेशीर ठरला आहे. आरसीबीविरुद्ध त्यानं 22 बॉलमध्ये 47 धावांची खेळी केली. 


सुनील नरेननं  केकेआरच्या डावाची सुरुवात करताना आरसीबीच्या बॉलिंगची धुलाई केली. सुनील नरेन आणि फिलीप सॉल्ट प्रत्येक ओव्हरमध्ये फटकेबाजी करत होते. नरेन आणि सॉल्टच्या जोडीनं आरसीबीच्या बॉलर्सवर दबाव आणला. नरेननं 2 चौकार आणि 5 सिक्स मारत 22 बॉलमध्ये 47 धावा केल्या. सुनील नरेननं 215 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. 500 टी-20 मॅचेस खेळणारा सुनील नरेन हा पहिला स्पिनर ठरला आहे. 


 
फाफ डु प्लेसिसनं डावाची सातवी ओव्हर मयंक डागरच्याकडे (Mayank Dagar) सोपवली होती. तोपर्यंत केकेआरच्या धावा 80 पेक्षा जास्त झाल्या होत्या. मयंक डागरनं 101.8 किमी प्रतितासच्या वेगानं  यॉर्कर टाकला. हा यॉर्कर कोलताकाच्या सुनील नरेनला समजला नाही आणि बॉल थेट स्टम्पवर जाऊन आदळला. मयंक डागरच्या या बॉल रोखण्यासाठी सुनील नरेनला बॅट खाली घेण्याची वेगावमुळं संधीच मिळाली नाही. आरसीबीला पहिलं यश मयंक डागरनं मिळवून देताच बंगळुरुच्या प्रेक्षकांनी जल्लोष केला.



सुनील  नरेन आणि फिलीप सॉल्टनं केकेआरचा विजय पक्का केला


आरसीबीनं दिलेल्या 183 धावांचं आव्हान पूर्ण करताना केकेआरला आक्रमक सुरुवातीची गरज होती. केकेआरकडून डावाची सुरुवात करणाऱ्या फिलीप सॉल्ट आणि सुनील नरेननं पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागिदारी केली. सातव्या ओव्हरमध्ये 80 पेक्षा जास्त धावा नरेन सॉल्ट जोडीनं केल्या होत्या. कोलकाताच्या इतर फलदाजांसाठी विजयासाठी आवश्यक असलेली धावसंख्या पूर्ण करणं सॉल्टच्या 30 आणि नरेनच्या 47 धावांच्या खेळीमुळं सोपं झालं होतं.  


दरम्यान, आयपीएलमध्ये गेल्या सहा वर्षांमध्ये आरसीबीला केकेआरला पराभूत करता आलेलं नाही. केकेआरनं कालच्या विजयासह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 


संबंधित बातम्या : 



IPL 2024 : आरसीबीच्या स्वप्नांवर पाणी फेरणाऱ्या व्यंकटेश अय्यरचा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात लांब सिक्स,बॉल थेट स्टेडियम बाहेर