RCB IPL 2024 : यंदाच्या हंगामात आरसीबीला (RCB ) लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दिग्गजांचा भरणा असणाऱ्या आरसीबीला विजयाची लय अद्याप सापडलीच नाही. सात सामन्यापैकी आरसीबीने 6 सामने (RCB) गमावले आहेत. आरसीबीचं प्लेऑफचं गणितही आता कठीण झालं आहे. आरसीबीला प्लेऑपमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित सातही सामन्यात विजय मिळवावा लागेल. संघाची ही कामगिरी पाहून आरसीबीच्या चाहत्यांमध्ये निराशा आहे. आरसीबीच्या या कामगिरीमुळे न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस (Scott Styris) याला ट्रोल कऱण्यात येत आहे. स्टायरिसनं जेव्हा जेव्हा आरसीबीची जर्सी घातली, तेव्हा तेव्हा आरसीबीचा पराभव झाल्याचं समोर आले आहे.
स्कॉट स्टायरिस यानेहीही हे मान्य केलेय. स्टायरिस आरसीबीसीठी बॅड लक ठरत आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे. हैदराबादविरोधात घरच्या मैदानावर आरसीबीला 25 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीने धावांचा पाठलाग करताना 267 धावांपर्यंत मजल मारली, तरीही पदरी निराशाच पडली. आरसीबीचा हा लागोपाठ पाचवा पराभव तर एकूण सहावा पराभव ठरला आहे. आरसीबीचा लागोपाठ पाचवा पराभव तेव्हा झाला, त्या सामन्यामध्ये स्कॉट स्टायरिस यानं आरसीबीची जर्जी घालून समालोचन केलं होतं. स्टायरिसला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. स्टायरिस याला याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला की आरसीबीसीठी मी खरचं बॅड लक ठरत आहे.
एबी डिव्हिलियर्स यानं एकदा सीएसकेची जर्सी घालावी, मी आरसीबीची जर्सी घालायचं सोडून देईल, असं स्टायरिसनं जिओ सिनेमावर समालोचन करताना म्हटलं आहे. स्टायरिसनं जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा आरसीबीचा पराभव झाला. त्यामुळे एबी डिव्हिलियर्स यानं स्टायरिसनं तात्काळ आरसीबीची जर्सी घालणं बंद करावं, असं ट्वीट केले होते. याचं प्रत्युत्तर देताना स्टायरिसनं एबीला सीएसकेची जर्सी घालावी, असं सांगितलं.
यंदाच्या हंगामात आरसीबीकडून अतिशय खराब कामगिरी करण्यात आली आहे. आरसीबीने सात सामन्यात फक्त एक विजय मिळवला आहे. दोन गुणांसह आरसीबी दहाव्या स्थानावर विराजमान आहे. आरसीबीला सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आरसीबीचं प्लेऑफचं गणित कठीण झालं आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित सर्व सात सामन्यात विजय अनिवार्य झाला आहे. आरसीबीकडून फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. पण गोलंदाजांना अद्याप सूर गवसलेला नाही. आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला अद्याप भेदक मारा करता आला नाही. सिराज, फर्गुसन, टोप्लीसह सर्वच गोलंदाज फ्लॉप ठरलेत. फिरकी गोलंदाजीही दुबळी असल्याचं दिसतेय.