गेल्या आठवड्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयस चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना झाला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हीच नाणेफेक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती. 


मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या डोक्यावरून मागील बाजूने नाणं फेकताना दिसतोय. यावेळी नाणेफेकीसाठी उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या मागील बाजूस हे नाणं पडताना दिसतं. मॅच रेफरी जवागल श्रीनाथ हे नाणं उचलण्यासाठी माघारी फिरतात. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मॅच रेफरीवर टॉस फिक्सिंगचा आरोप केला होता. 






सदर नाणेफेकीचा अनुभव आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस हैदराबाचा कर्णधार पॅट कमिन्सला सांगत असल्याचे कालच्या सामन्यातून दिसून आले. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याच्या नाणेफेकीवेळी आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने हातवारे करत पुन्हा एकदा या वादाला तोंड फोडलं. या सामन्यात नाणेफेक होण्याच्या काही सेकंद आधी फाफ ड्यू प्लेसिस आणि हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स बोलत होते.फाफ ड्यू प्लेसिस मुंबईत नाणेफेकीदरम्यान पॅट कमिन्सला काय घडलं ते सांगत होता इतकंच नाही तर ड्यू प्लेसिसने जे सांगितले ते ऐकून कमिन्स थोडे आश्चर्यचकित दिसून आला.






आरसबीचा हैदराबादविरुद्ध 25 धावांनी पराभव-


तब्बल 549 धावा कुटल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 25 धावांनी नमवले. हैदराबादनं दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीनं 262 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेसिस यांनी लढा दिला, पण विजय मिळून देऊ शकले नाहीत. हैदराबादकडून पॅट कमिन्स यानं भेदक मारा केला. कमिन्सनं आरसीबीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. आरसीबीला सात सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादनं चौथ्या विजयाची नोंद केली. हैदराबादचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे. 


संबंधित बातम्या:


काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या