चंदीगड : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पंजाब किंग्जला 3 विकेटनं पराभूत केलं. राजस्थाननं यंदाच्या आयपीएलमध्ये पाचवा विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघानं पंजाबला (Punjab Kings) होमग्राऊंडवर  पराभूत करत पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर कमबॅक केलं.  राजस्थान रॉयल्सच्या हातून मॅच निसलटली होती. पंजाब किंग्जच्या हाती मॅच गेलेली असताना मूळचे वेस्ट इंडिजचे खेळाडू असलेल्या शिमरन हेटमायर आणि रोवमॅन पॉवेल यांनी राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. शिमरन हेटमायरनं (Shimron Hetmyer) 10 बॉलमध्ये 27 धावा केल्या. राजस्थानला विजय मिळवून दिल्यानंतर शिमरन हेटमायरनं शेवटच्या ओव्हरमध्ये त्याच्या मनात काय विचार सुरु होते यासंदर्भात माहिती दिली आहे. 


शिमरन हेटमायरनं 10 बॉलमध्ये 27 धावा करुन राजस्थानला विजय मिळवून दिला. मॅचनंतर शिमरन हेटमायरनं शेवटच्या ओव्हरमध्ये त्याच्या मनात काय सुरु होतं, यासंदर्भात माहिती दिली. फलंदाजीचा कठोर सराव केल्यानं अखेरच्या ओव्हरमध्ये बॉल  सीमारेषेबाहेर मारता आले, असं हेटमायर म्हणाला. राजस्थानला विजयासाठी 30 धावांची आवश्यकता असताना हेटमायर आणि पॉवेल यांनी दमदार फटकेबाजी केली. पंजाबच्या हातून या दोघांनी विजय हिरावून घेतला आणि राजस्थानला पाचवा विजय मिळवून दिला आहे. 


शिमरन हेटमायरनं 10 बॉलमध्ये 27 धावा करत विजय मिळवून दिल्यानं  त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. हेटमायरनं तीन षटकार आणि एक चौकार मारला. हेटमायरनं मॅचनंतर बोलताना म्हटलं की नेटमध्ये खूप सराव करतो. षटकार मारण्याचे पूर्णपणे प्रयत्न करत असतो,  आज त्यात यश आल्यानं संघाला विजय मिळवण्यात मदत झाल्याचं  हेटमायर म्हणाला.


शेवटच्या ओव्हरमध्ये मनात काय सुरु होतं?


राजस्थान रॉयल्सला अखेरच्या ओव्हरमध्ये विजय मिळवून देण्याचं काम शिमरन हेटमायरनं केलं. राजस्थानला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगनं  पहिल्या दोन बॉलमध्ये एकही रन न दिल्यानं हेटमायरवरील दबाव वाढला होता. यानंतर तिसऱ्या बॉलवर हेटमायरनं सिक्स मारला. हेटमायरनं चौथ्या बॉलवर देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला दोन धावा मिळाल्या. राजस्थानला शेवटच्या दोन बॉलमध्ये दोन धावा हव्या होत्या. यावेळी नेमकं मनात काय सुरु होतं याबाबत हेटमयारनं सांगितलं. 


हेटमायरनं पाचव्या बॉलपूर्वी  ट्रेंट बोल्टला संधी मिळाल्यास एक रन घ्यायची हे सांगून ठेवल्याचं म्हटलं. यामुळं धावसंख्या बरोबरीत आली असती. यामुळं मॅच जरी जिंकली नसती तरी अंतिम निर्णयासाठी सुपर ओव्हरमध्ये जावं लागलं असतं. मात्र, हेटमायरनं पाचव्या बॉलवर षटकार मारत राजस्थानला विजय मिळवून दिला आहे.  
      
संबंधित बातम्या : 


टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान


सुनील नारायण, आद्रे रसेल, निकोलस पूरन...; आज कोणाला कर्णधार बनवाल,पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम