IPL 2024: RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काल झालेल्या सामन्यात बंगळुरुने 35 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील आरसीबीचा हा दुसरा विजय ठरला. तसेच हैदराबादविरुद्धच्या या विजयामुळे आयपीएलमधील आरसीबीचं आव्हान देखील कायम राहिलं आहे.
आरसीबीकडून रजत पाटीदारने (Rajat Patidar) अवघ्या 19 चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. 20 चेंडूंचा सामना करत त्याने 250 च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.
6,6,6,6...चार चेंडूत चार षटकार (4 CONSECUTIVE SIXES BY RAJAT PATIDAR)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावातील 11 वे षटक सनरायझर्स हैदराबादसाठी लेगस्पिनर मयंक मार्कंड्ये टाकत होता. रजत पाटीदार त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. मयंकने प्रथम वाइड बॉल टाकला. यानंतर, पुढच्या 4 चेंडूंवर जे घडले ते कदाचित कोणीही कल्पना केली नसेल. पाटीदारने पुढच्या 4 चेंडूंवर 4 षटकार ठोकले. त्या षटकात मयंक मार्कंड्येने एकूण 27 धावा दिल्या.
कोहलीचे 37 चेंडूत अर्धशतक-
या सामन्यात विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले. या काळात त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला. कोहलीने रजत पाटीदारसह तिसऱ्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या, तर फाफ डू प्लेसिससोबत पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीचे या मोसमातील हे चौथे अर्धशतक आहे. याआधी त्याने पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
विराट कोहलीनं 10 हंगामात 400 पेक्षा जास्त धावा केल्या -
आयपीएल 2008 पासून विराट कोहली आरसीबीसाठी खेळत आहे. विराट कोलीने 2011 मध्ये पहिल्यांदा 400 धावांचा पल्ला गाठला होता. त्यानं 16 सामन्यात 557 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर 2012, 2014, 2017 आणि 2022 या चार हंगामात विराट कोहलीला 400 धावांचा पल्ला पार करता आला नाही. म्हणजेच, 2008,2009,2010, 2012, 2014, 2017 आणि 2022 या सात हंगामात विराट कोहलीला 400 धावांचा पल्ला पार करता आला नाही. तर विराट कोहलीने 10 हंगामात 400 धावांचा टप्पा पार केला आहे.
संबंधित बातम्या:
10 व्या स्थानावरुन प्ले ऑफच्या फेरीपर्यंत; आरसीबीचा पुढील मार्ग कसा असेल?, जाणून घ्या समीकरण!
Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम