IPL 2024 RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दणदणीत विजय; दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 47 धावांनी विजय

IPL 2024 RCB vs DC: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना होणार आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 12 May 2024 11:06 PM
आरसीबीचा 47 धावांनी विजय

दिल्लीविरुद्ध आरसीबीने 47 धावांनी विजय मिळवला आहे.

आरसीबीची धावसंख्या 135/9

आरसीबीची धावसंख्या 135 वर पोहचली आहे. 

दिल्लीला विजयासाठी 60 धावांची गरज

दिल्लीला विजयासाठी 27 चेंडूत 60 धावांची गरज आहे. मात्र दिल्लीने 8 विकेट्स गमावल्या आहेत.

अभिषेक पुरेल बाद

दिल्लीचा सलामीवीर अभिषेक पुरेलही बाद झाला आहे. 

दिल्लीला पहिला धक्का

दिल्लीला पहिला धक्का बसला आहे. महत्वाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर बाद झाला.

दिल्लीला विजयासाठी 188 धावांचं आव्हान

बंगळुरुने दिल्लीला विजयसाठी 188 धावांचं आव्हान दिलं आहे.

विल जॅक्सही माघारी

विल जॅक्स 41 धावा करत बाद झाला आहे.

रजत पाटीदार बाद; बंगळुरुला तिसरा धक्का

रजत पाटीदार बाद झाला आहे. पाटीदारने 32 चेंडुत 52 धावांची खेळी केली.

रजत पाटीदारचे अर्धशतक

बंगळुरुच्या रजत पाटीदारने अर्धशतक झळकावले आहे. 

बंगळुरुला मोठा धक्का, कोहली बाद

बंगळुरुला दुसरा मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली 27 धावांवर बाद झाला आहे.

कर्णधार ड्यु प्लेसीस बाद

बंगळुरुला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार फाफ ड्यु प्लेसीस बाद झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन):

जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (w), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (c), कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन):

फाफ डू प्लेसिस (c), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (w), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल

दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

दिल्लीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ: 

जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल, शाई होप (W), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल (C), कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, रसीख दार सलाम, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, सुमित कुमार, ललित यादव, पृथ्वी शॉ, लिझाद विल्यम्स, डेव्हिड वॉर्नर, रिकी भुई, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संपूर्ण संघ: 

फाफ डू प्लेसिस (C), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, अनुज रावत , सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशक, मयंक डागर, ग्लेन मॅक्सवेल, आकाश दीप, रीस टोपले, टॉम कुरन, अल्झारी जोसेफ, मनोज भंडागे, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा

पार्श्वभूमी

IPL 2024 RCB vs DC: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरुतील एम.चिन्नास्वामी मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. प्ले ऑफ गाठायचं असल्यास दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आजचा सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.