IPL 2024 Points Table: आयपीएल 2024 च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. तर कोलकाता नाईट रायझर्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदवला. पंजाब आणि कोलकात्याच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स अजूनही अव्वल स्थानावर आहे. चेन्नईने हंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव केला होता. सीएसके, पंजाब आणि कोलकाता यांचे प्रत्येकी 2 गुण आहेत.


गुणतालिकेत CSK अव्वल स्थानावर आहे. त्याचे 2 गुण आहेत. यासोबत +0.779 नेट रन रेट आहे. पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबचे 2 गुण आणि +0.455 नेट रन रेट आहे. कोलकाताचे देखील 2 गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट +0.200 आहे. आरसीबी गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. दिल्ली 9व्या तर हैदराबाद 8व्या क्रमांकावर आहे. या तिन्ही संघांचा नेट रन रेट देखील खराब आहे.






केकेआर अन् हैदराबादचा रोमांचक सामना


शनिवारी (काल) झालेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या होत्या. यादरम्यान फिल सॉल्टने अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूंचा सामना करत 54 धावा केल्या. सॉल्टने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. आंद्रे रसेलने 25 चेंडूंचा सामना करत 64 धावा केल्या. त्याने 7 षटकार आणि 3 चौकार मारले. प्रत्युत्तरात हैदराबादने 7 गडी गमावून 204 धावा केल्या. त्यासाठी हेनरिक क्लासेनने 29 चेंडूत 63 धावा केल्या.






आज पुन्हा डबल हेडर-


आयपीएल 2024 चा पुढील सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना आज जयपूर येथे होणार आहे. यानंतर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल. 


IPLच्या  महाअंतिम सामन्याचं ठिकाणही आलं समोर!


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2024) चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला क्वालिफायर सामना आणि एक एलिमिनेटरचा सामना तर दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईमध्ये होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आयपीएलचे 7 एप्रिल पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित आयपीएलचे वेळापत्रक निश्चित केले आहे आणि लवकरच ते जाहीर केले जाईल.


संबंधित बातमी:


KKR vs SRH: 6 चेंडू 13 धावा, 'इम्पॅक्ट प्लेअर'चा झेल अन् बाजी पलटली; Video मधून पाहा शेवटच्या षटकाचा थरार