IPL 2024 चंदीगढ: पंजाब किंग्ज (Punjab Kings ) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील मॅच अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगली. पंजाब कॅपिटल्सनं अखेरच्या ओव्हरमध्ये दिल्लीला पराभूत केलं. दिल्लीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 174 धावा केल्या. दिल्लीकडून डेविड वॉर्नर, शे होप आणि अभिषेक पोरेल यांनी चांगली फलंदाजी केली. दुसरीकडे पंजाब किंग्जची देखील चांगली सुरुवात शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी केली होती. मात्र, दोघेही इशांत शर्माच्या ओव्हरमध्ये बाद झाले. सॅम करन आणि लियाम लिविंगस्टन यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर पंजाबनं दिल्लीला पराभूत केलं. 


सॅम करननं पंजाबच्या विजयाचा पाया रचला तर  लिविंगस्टननं टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. लिविंग्सटननं अखेरच्या ओव्हरमध्ये सिक्स मारत पंजाबला यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवून दिला. रिषभ पंतनं (Rishabh Pant) 30 डिसेंबर 2022 ला झालेल्या अपघातानंतर आज तब्बल  454 दिवसांनंतर मैदानावर कमबॅक केलं.रिषभ पंतला बॅटिंग करताना मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी विकेटकीपिंगमध्ये त्यानं जोरदार कामगिरी करुन दाखवली. जितेश शर्माला रिषभनं ज्या प्रकारे बाद केलं ते पाहून अनेकांना  महेंद्रसिंह धोनीची आठवण आली.  


रिषभ पंतमध्ये दिसली धोनीची झलक


महेंद्रसिंह धोनीची विकेटकीपिंग करतानाची चपळता अनेक युवा विकेटकीपरसाठी आदर्श ठरते. अनेक जण धोनीला आदर्श मानतात. धोनीच्या चपळाईपुढं अनेक मोठे मोठे फलंदाज फसले आहेत. आजच्या मॅचमध्ये रिषभ पंतनं देखील महेंद्रसिंह धोनी प्रमाणं चपळता दाखवली. रिषभ पंतनं धोनी प्रमाणं विकेटकीपिंग करुन पंजाबच्या जितेश शर्माला आऊट केलं. 


पंजाब किंग्जचा बॅटसमन जितेश शर्मा डावाच्या 12 व्या ओव्हरमध्ये रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करत होता. कुलदीप यादवच्या बॉलिंगवर जितेश शर्माचा प्रयत्न फसला आणि बॉल थेट रिषभ पंतच्या हातात गेला. मग रिषभनं कसलाही वेळ न लावता स्टंपिगं केलं आणि जितेशला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.  




जितेश शर्मानं कुलदीप यादवच्या ओव्हरमध्ये रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचा बॅलन्स गेला आणि तो पांढऱ्या रेषेच्या बाहेर गेला. तितक्यात रिषभनं स्टम्प्सच्या बेल्स उडवल्या आणि जितेश शर्मा फक्त पाहत राहिला. रिषभ पंतची ही चपळता पाहून अनेकांना महेंद्रसिंह धोनीची आठवण आली.  


पंजाबनं मॅच जिंकली  


दिल्लीनं पंजाबपुढं 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबला कॅप्टन शिखर धवननं आक्रमक सुरुवात करुन दिली होती. सॅम करन आणि आणि लिविगंस्टननं चांगली फलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला. सॅम करन मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानंतर लिविंगस्टननं सिक्स मारत पंजाबला विजय मिळवून दिला.


संबंधित बातम्या : 


क्लासेन लढला, नडला, पहाडासारखा उभा राहिला, मात्र किंग खानची KKR च बाजीगर!


Suryakumar Yadav : या क्षणासाठी सर्वांनी वाट पाहिली, रिषभ पंतसाठी सूर्यकुमार यादवची भावनिक पोस्ट