IPL 2024 points table : पॅट कमिन्सच्या सनरायजर्स हैदराबादने थरारक सामन्यात पंजाबचा दोन धावांनी (PBKS vs SRH) पराभव केला. हैदाराबादने प्रथम फलंदाजी करताना 182 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पंजाबला 180 धावांवर रोखलं. थरारक विजय विजय मिळवल्यानंतरही हैदराबादला टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आले नाही. हैदराबादच्या नावावर तीन विजयासह सहा गुण आहेत. राजस्थानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. 

टॉप 4 ची स्थिती कशी ? 

गुणतालिकेत राजस्तानचा संघ अव्वल स्थानावर आहे. राजस्थानने चार सामन्यात चार विजय मिळवत आठ गुणांची कमाई केली आहे. यंदाच्या हंगामात फक्त राजस्थानचाच संघ अजेय आहे. श्रेयस अय्यरचा कोलकाता नाइट रायडर्स गुणतालिकेत तीन विजयासह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौ आणि चेन्नई हे संघ अनक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत. लखनौनं चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत, तर चेन्नईनेही तीन विजय मिळवले आहेत. पण लखनौचा रनरेट सरस आहे, त्यामुळे ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

सनसनाटी विजय मिळवूनही हैदराबादला फायदा नाहीच - 

पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाने पंजाबवर दोन धावांनी थरारक विजय मिळवला. पण गुणतालिकेत त्यांना फायदा झाला नाही. हैदराबादने पाच सामन्यात तीन विजय मिळवलेत, तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. हैदराबादच्या नावावरही सहा गुणांची नोंदआहे. हैदराबादचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. तर पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाबला पाच सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला. चार गुणांसह ते सहाव्या स्थानी आहेत. 

दिल्ली तळाला, अखेरच्या चार क्रमांकावर कोण कोण? 

दिल्ली आणि आरसीबी संघाची स्थिती यंदाच्या हंगामात अतिशय खराब आहे. दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. दिल्ली आणि आऱसीबीला आतापर्यंत चार पराभवाचा सामना करावा लागलाय. दोन्ही संघाचा फक्त एक एक विजय झाला आहे. दिल्ली दहाव्या तर आरसीबी नवव्या स्थानावर आहे. गुजरातने पाच सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. शुभमन गिलचा गुजरात संघ सातव्या क्रमांकावर आहे तर मुंबई आठव्या स्थानी आहे. मुंबईला चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय. 

गुणतालिकेत कोण कोणत्या स्थानी ?

 
अनुक्रमांक संघाचे नाव सामने विजय टाय पराभव गुण नेटरनरेट
1.
राजस्थान रॉयल
RR
4 4 0 0 8 1.120
2.
कोलकाता नाईट रायडर्स
KKR
4 3 0 1 6 1.528
3.
लखनौ सुपर जायंट्स
LSG
4 3 0 1 6 0.775
4.
चेन्नई सुपर किंग्स
CSK
5 3 0 2 6 0.666
5.
सनरायजर्स हैदराबाद
SRH
5 3 0 2 6 0.344
6.
पंजाब किंग्स
PBKS
5 2 0 3 4 -0.196
7.
गुजरात टायटन्स
GT
5 2 0 3 4 -0.797
8.
मुंबई इंडियन्स
MI
4 1 0 3 2 -0.704
9.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
RCB
5 1 0 4 2 -0.843
10.
दिल्ली कॅपिटल्स
DC
5 1 0 4 2 -1.370