IPL 2024 Playoffs: आयपीएल 2024 मध्ये प्ले ऑफमध्ये सध्या 2 जागा रिक्त आहेत, ज्यासाठी 5 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आधीच पात्र झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स अजूनही स्पर्धेत आहेत. याचदरम्यान अनेक माजी खेळाडूंनी प्ले ऑफच्या फेरीत कोणते 4 संघ असतील, याबाबत भाष्य केलं आहे. 


इरफान पठाणचे टॉप-4 संघ:


इरफान पठाणच्या मते, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफसाठी पात्र ठरतील. चेन्नईचा संघ अव्वल-4 मध्ये पोहोचण्यासाठी नक्कीच काहीतरी मार्ग काढेल.


अंबाती रायुडूचे टॉप-4 संघ:


अंबाती रायुडूनेही इरफान पठाणने नमूद केलेल्या चार संघांची निवड केली आहे. कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफसाठी पात्र ठरतील असं अंबाती रायडू म्हणाला. यासोबतच चेन्नई दुसऱ्या स्थानावर येण्यात यशस्वी होईल, असंही रायडूने सांगितले.


मोहम्मद कैफचे टॉप-4 संघ:


कोलकाता आणि राजस्थान आधीच पात्र ठरले आहेत. त्यांच्याशिवाय सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफमध्ये जाण्याची आशा कैफने व्यक्त केली आहे. कैफ म्हणतो की, चेन्नईला मोठ्या सामन्यांचे दडपण कसे हाताळायचे हे माहित आहे, त्यामुळे ते बंगळुरुला हरवू शकतील.


मॅथ्यू हेडन आणि टॉम मूडी यांनीही आरसीबीकडे दुर्लक्ष केले-


अनुभवी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन आणि टॉम मूडी यांनीही विश्वास व्यक्त केला की, कोलकाता, राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नई टॉप-4 मध्ये राहतील. चेन्नई सुपर किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दबावाने भरलेल्या सामन्यात पराभूत करण्यात यशस्वी होईल, असे हेडनचे म्हणणे आहे.


आरसीबीचं प्लेऑफचं समीकरण कसं असेल ? 


आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.  चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबादच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर हैदराबादचा उर्वरित दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला तर आरसीबी आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात. 


संबंधित बातम्या:


ICC T-20 World Cup 2024: दोनदा टोलावले 6 चेंडूत 6 षटकार; 9 चेंडूत अर्धशतक; टी-20 विश्वचषकात या खेळाडूवर असेल सर्वांचं लक्ष!


किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?


आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार