चेन्नई :आयपीएलच्या (IPL 2024) 39 व्या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटसनं (Lucknow Super Giants) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) दणदणीत पराभव केला. लखनौ सुपर जाएंटसच्या मार्कस स्टोइनिसनं संघाला एकहाती विजय मिळवून दिला. लखनौनं चेन्नईचा सहा विकेटनं पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) लखनौ विरुद्ध 108 धावंची खेळी केली. चेन्नईसाठी कॅप्टन म्हणून शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. ऋतुराजच्या शतकी खेळामुळं ऑरेंजच्या कॅपच्या शर्यतीत मोठा उलटफेर झाला आहे. ऋतुराजनं शतकी खेळीच्या जोरावर ऑरेंज कॅपच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. विराट कोहलीपासून तो 30 धावांनी पिछाडीवर आहे.
ऋतुराज गायकवाडची मोठी झेप
चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावलं. या शतकाच्या जोरावर त्यानं ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऋतुराज गायकवाडनं लखनौ सुपर जाएंटसविरुद्ध 108 धावांची खेळी केली. तर, ऋतुराज गायकवाडनं आतापर्यंत 349 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माला धक्का, टॉप 5 मधून बाहेर
ऋतुराज गायकवाडनं शतकी खेळी केल्यानं त्यानं ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. यामुळं रोहित शर्मा टॉप 5 मधून बाहेर गेला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रोहित शर्मा आता सातव्या स्थानावर आहे. तर, सहाव्या स्थानावर शिवम दुबे आहे. शिवम दुबे यानं 311 धावा केल्या असून रोहित शर्मानं 303 धावा केल्या आहेत.
विराट कोहली टॉपवर
विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटनं एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकवली आहेत. विराटनं 150.39 च्या स्ट्राइक रेटनं 379 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड विराट कोहलीपेक्षा 30 धावांनी पिछाडीवर आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण?
विराट कोहली, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 379 धावा
ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्ज, 349 धावा
ट्रेविस हेड , सनरायजर्स हैदराबाद, 324 धावा
रियान पराग , राजस्थान रॉयल्स, 318 धावा
संजू समॅसन , राजस्थान रॉयल्स, 314 धावा
शिवम दुबे, चेन्नई सुपर किंग्ज, 311 धावा
रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स ,303 धावा
केएल. राहुल, लखनौ सुपर जाएंटस, 302 धावा
शुभमन गिल, गुजरात टायटन्स, 298 धावा
सुनील नरेन, कोलकता नाईट रायडर्स 286 धावा