LSG vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातील सामन्यात केएल राहुल (KL Rahul) अंपायरशी भिडला. मार्कस स्टॉइनिसच्या चेंडूवर लखनौचा कर्णधार राहुलने चेन्नईच्या रविंदिर जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट न दिल्याने डीआरएस घेतला. मैदानावरील पंचांनी जडेजाला नाबाद घोषित केले होते, पण डीआरएसनंतर टीव्ही पंचांनीही जडेजाला नाबाद घोषित केलं. यामुळे केएल राहुल अंपायरशी जाऊन भिडला. काही दिवसांपूर्वी  बंगळुरु विरुद्ध कोलकाता (RCB vs KKR) मॅचमध्ये विराट कोहलीही अंपायरवर भडकला होता. कोहली भरमैदानात अंपायरशी वाद घालताना दिसला होता. 






भरमैदानात पंचाशी भिडला केएल राहुल


चेन्नईच्या फलंदाजी वेळी आठव्या षटकावेळी ही घटना घडली. स्टॉइनिसच्या षटकातील पाचव्या चेंडूवर चेंडू जडेजाच्या पॅडला लागला. स्टॉइनिसने अपिल केलं केले आणि त्यानंतर केएल राहुलनेही रिव्ह्यू घेण्यास होकार दिला. कमेंटेटर्सच्या मते, चेंडू अधिक उसळी घेऊ शकला असता, त्यामुळे राहुलने डीआरएस घेण्याबाबतही शंका व्यक्त केली होती. जेव्हा डीआरएस घेण्यात आला तेव्हा चेंडू ट्रॅकिंग सिस्टमने पाहिले की, चेंडू लेग स्टंपच्या वर गेला होता. चेंडू इतका कसा उसळू शकतो, हे राहुलला समजलं नाही. यामुळे त्याने मैदानावरील पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली.


केएल राहुलचा अप्रतिम झेल


याच सामन्यात राहुलने अजिंक्य रहाणेचाही उत्कृष्ट झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पहिल्याच षटकात चेंडू अजिंक्य रहाणेच्या बॅटला लागला आणि कीपरच्या दिशेने गेला. राहुलने अतिशय दमदार शैलीत उडी मारत हा झेल घेतला. रहाणे तीन चेंडूत फक्त एक धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह चेन्नई सुपर किंग्जने आपली पहिली विकेट अवघ्या चार धावांत आणि पहिल्या षटकात गमावली, त्यामुळे चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली.





महत्त्वाच्या इतर बातम्या :


CSK vs LSG : स्टोइनिसचं शतक ऋतुराजवर भारी, लखनौचा 6 विकेट्सने विजय