मुंबई : आयपीएलमध्ये  इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर केला जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये काही संघांना त्याचा फायदा होताना दिसत आहे. यासंदर्भात रोहित शर्माला (Rohit Sharma) त्याचं मत विचारण्यात आलं असता त्यानं इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा चाहता नसल्याचं म्हटलं आहे. क्रिकेट हा अकरा खेळाडूंचा खेळ असून बारा खेळाडूंचा नव्हे असल्याचं रोहितनं म्हटलं. 


वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबेवर अन्याय


रोहित शर्मानं तुमच्या बाजूला असलेल्या लोकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीनं तुम्ही कुणाला बाहेर काढू नये. इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा मी चाहता नाही. वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे यांना यामुळं संधी मिळत नाही. मी या नियमाचा चाहता नाही, असं रोहित शर्मा म्हणाला. मी याबद्दल काही सांगू शकत नाही मात्र इम्पॅक्ट प्लेअर मात्र त्याचा चाहता नाही. मात्र, इम्पॅक्ट प्लेअर नियम मनोरंजनात्मक आहेत. तुम्हाला जेव्हा धावांची गरज असते त्यावेळी तुम्ही खेळाडू ला सहभागी घेऊ करुन शकता. ज्यावेळी तुम्हाला विकेट काढायची असेल त्यावेळी तुम्ही बॉलरला संघात घेऊ शकता, असं रोहित शर्मा म्हणाला. 
 
अजित आगरकर दुबईत गोल्फ खेळत आहे. राहुल द्रविड त्याच्या मुलाच्या क्रिकेटवर लक्ष देत आहे, त्यामुळं आम्ही टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात भेटलेलो नाही,असं रोहित शर्मा म्हणाला. आयपीएल आता वेगळ्या पातळीवर पोहोचलेलं आहे. टीव्ही ब्रॉडकास्टिंग असेल, प्रादेशिक भाषा असतील, स्टार स्पोर्टसनं सात आठ वर्षांपूर्वी हिंदी भाषेत प्रक्षेपण केलं होतं. भारतातील ग्रामीण भागात देखील आयपीएल पाहिलं जातं, असं रोहित शर्मा म्हणाला.


रोहित शर्मा आयपीएलमध्ये 250 वा सामना खेळणार


रोहित शर्मानं आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून क्रिकेट खेळलेलं आहे. रोहित शर्मा आज पंजाब इंडियन्स विरुद्ध 250 वी आयपीएल मॅच खेळणार आहे. रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करताना पाचवेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळत असताना त्या संघानं 2009 च्या आयपीएलमध्ये विजय मिळवला होता. 


मुंबई आणि पंजाब आमने सामने


आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमने सामने येणार आहेत. आयपीएलमध्ये गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या स्थानावर असलेल्या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. मुंबई इंडियन्सनचा सहापैकी चार मॅचमध्ये पराभव झाला आहे. तर, पंजाब किंग्जचा देखील सहापैकी चार मॅचमध्ये पराभव झाला आहे. दोन्ही संघांनी दोन दोन मॅच जिंकलेल्या आहेत.  


संबंधित बातम्या : 


Rohit Sharma : विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग करणार का? रोहित शर्मानं खरं काय ते सगळं सांगून टाकलं


DC vs GT: दिल्लीचा रेकॉर्डब्रेक विजय, रिषभ पंतचा आनंद गगनात मावेना, मॅच संपताच यशाचं सिक्रेट फोडलं