मुंबई :गेल्या काही दिवसांपासून आगामी टी-20 वर्ल्ड (T-20 World Cup ) कपच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या डावाची सुरुवात करतील, अशी चर्चा देखील सुरु होती. रोहित शर्मानं देखील या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मानं क्लब पॅरी फायर या यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टवर बोलताना स्पष्टपणे काही गोष्टी मांडल्या आहेत. रोहित शर्मानं आम्ही वर्ल्ड कपसंदर्भात अजून भेटलेलो नाही, काही ठरलेलं नाही, असं म्हटलं.
रोहित शर्मा विराट कोहलीबद्दल नेमकं काय म्हणाला?
टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात बोलताना रोहित शर्मा म्हणाला की आम्ही अजून भेटलेलो नाही.टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात काही ठरलेलं नाही. वर्ल्ड कपमध्ये कोण डावाची सुरुवात करणार हे ठरलेलं नाही. सध्याच्या काळात तुम्ही जोपर्यंत माझ्याकडून, राहुल द्रविड किंवा अजित आगरकर यांच्याकडून काही ऐकत नाही तोपर्यंत या सर्व अफवा आहेत, असं रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्माला याच पॉडकास्टमध्ये दिनेश कार्तिक किंवा महेंद्रसिंह धोनी यांना संधी मिळेल का असं विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना रोहित शर्मानं ज्या प्रकारे बॅटिंग करताना दिनेश कार्तिकला पाहतोय त्यानं प्रभावित आहे. महेंद्रसिंग धोनीनं चार बॉलमध्ये 20 धावा केल्या त्यानं खूप परिणाम झाला होता. धोनी सध्या अमेरिकेला येऊन गोल्फ खेळत असतो. धोनी पेक्षा दिनेश कार्तिकला समजावून सांगणं सोपं असेल, असं रोहित शर्मा म्हणाला.
रिषभ पंतबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?
रिषभ पंतला लहानपणापासून पाहतोय, तो अपघातानंतर पुन्हा क्रिकेट खेळतोय हे पाहून आनंद होतो. रिषभ पंत ज्यावेळी माझ्याकडे येतो त्यावेळी हसवत असतो असं रोहित शर्मा म्हणाला. ज्यावेळी मला हसायचं असेल त्यावेळी रिषभ पंतला बोलावतो, असं रोहितनं सांगितलं. रोहित शर्मासोबत या पॉडकास्टमध्ये अॅडम गिलख्रिस्ट आणि मायकल वॉन देखील सहभागी झाले होते. गिलख्रिस्ट आणि रोहित शर्मा यांनी 2009 चं आयपीएल डेक्कन चार्जर्सला जिंकवून दिलं होतं. गिलख्रिस्ट त्यावेळी कॅप्टन होता तर रोहित शर्मा उपकप्तान होता.
मुंबई इंडियन्सची सुरुवात हळू झालेली आहे. गेली दहा वर्ष मी कॅप्टन होतो, पण प्रशिक्षक बदलत होते.मी एका विचारानं काम करत होतो, लोकांना कसं हाताळायचं माहिती होतं. अनेक खेळाडू येत होते, मला वानखेडे स्टेडियम माहिती होतं. आमच्याकडे मलिंगा, बुमराह, ओझा, जसप्रीत बुमराह, मिशेल जॉन्सन होते. मलिंगानं मुंबईसाठी योगदान दिलेलं आहे.रिकी पाँटिंग, महेला जयवर्धने आणि मार्क बाऊचर सोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता,असं रोहित शर्मा म्हणाला.
संबंधित बातम्या :
DC vs GT: दिल्लीचा रेकॉर्डब्रेक विजय, रिषभ पंतचा आनंद गगनात मावेना, मॅच संपताच यशाचं सिक्रेट फोडलं