नवी दिल्ली : आयपीएलच्या सतराव्या पर्वात मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) नेतृत्त्व हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्या मुंबईचं नेतृत्त्व करत आहे. रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व 2013 ते 2023 मध्ये केलं होतं. भविष्याचा विचार करुन मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला कॅप्टन केल्याचं बोललं जात होतं. रोहित शर्माला कॅप्टन पदावरुन हटवल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांकडून, माजी क्रिकेटपटूंकडून या निर्णयाबाद्दल वेगवेगळी मतं मांडण्यात आली होती. हे सर्व सुरु असतानाच मुंबई इंडियन्सचे पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर तर्क वितर्क सुरु झाले होते. 


दिल्ली, लखनौ आता चेन्नईची चर्चा


मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा पुढील आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स किंवा लखनौ सुपर जाएंटस कडून खेळेल अशा चर्चा सुरु होत्या. त्या चर्चा थांबतील अशी शक्यता सुरु असतानाच इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननं केलेल्या एका वक्तव्यामुळं रोहित शर्मा पुढील आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकतो, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 


इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननं देखील यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. यामुळं तर्क वितर्क सुरु झाले आहेत. एका पॉडकास्टमध्ये बोलताना वॉननं याबाबत वक्तव्य केलं आहे. वॉननं म्हटलं की रोहित शर्मा चेन्नईकडे जाऊ शकतो का? तो धोनीला रिप्लेस करेल काय? ऋतुराज गायकवाड या वर्षी फक्त जबाबदारी पार पडत असून पुढील वर्षी ती रोहितकडे येऊ शकते. मला त्याला चेन्नईच्या संघात पाहायचंय, असं मायकल वॉन म्हणाला. 


मुंबईच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक गोष्ट असेल. तो सनरायजर्स हैदराबादकडे गेला तरी काही वाटणार नाही. त्यानं डेक्कन चार्जर्सकडून देखील आयपीएलमध्ये प्रतिनिधीत्व केलेलं आहे, असं पॉडकास्टचा सूत्रसंचालक रणवीर अल्लाहबादियानं म्हटलं. 


मायकल वॉननच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातून रोहित शर्मा बाहेर पडणार विचारानं अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या चाहत्यांमधील स्पर्धा सर्वांना माहितीच आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलमध्ये प्रत्येकी पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे.  


मायकल वॉननं याच पॉडकास्टमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व रोहित शर्मानं केले पाहिजे, असं मत मांडलं. हार्दिक पांड्यानं मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक केलं आहे, याचा त्याच्यावर पुरेसा दबाव आहे. याशिवाय रोहित शर्मा भारतीय क्रिकेटच्या टी-20 टीमचा कॅप्टन असल्याचं देखील वॉननं म्हटलं. 


दरम्यान, रोहित शर्मानं हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात यंदाच्या आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. पाच मॅचमध्ये त्यानं 156 धावा केल्या होत्या.  मुंबई इंडियन्सचा पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईनं दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं आहे.


संबंधित बातम्या : 


RCB IPL 2024: आरसीबी अंतिम सामना खेळणार...8 वर्षे जुन्या इतिहासाची  पुनरावृत्ती होणार, नेमकं समीकरण काय?


दिल्लीचा विजय अन् 4 संघांचा क्रम बदलला;चेन्नईला सामना न खेळता फायदा झाला, पाहा IPL Points Table