मुंबई :  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात आयपीएलमधील (IPL 2024) 25 वी मॅच सुरु आहे. हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. गेल्या मॅचमध्ये शतक झळकावलेला विराट कोहली आज केवळ तीन धावा करुन बाद झाला. जसप्रीत बुमराहनं त्याला बाद केलं. आजच्या मॅचमध्ये बंगळुरुनं संधी दिलेला विली जॅक्स 8 धावा करुन बाद झाला. यानंतर आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) आणि रजत पाटीदार या दोघांनी डाव सावरला. बंगळुरुनं मुंबईपुढं विजयासाठी 197 इतक्या धावांचं आव्हान ठेवलं आहे. जसप्रीत बुमराहनं आरसीबीच्या पाच विकेट घेतल्या. 


रजत पाटीदार आणि फाफ डु प्लेसिस, दिनेश कार्तिकनं आरसीबीचा डाव सावरला


विराट कोहली आणि विली जॅक्स बाद झाल्यानंतर कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि  रजत पाटीदारनं बंगळुरुचा डाव सावरला. रजत आणि डु प्लेसिसनं 82 धावांची खेळी केली. रजत पाटीदारनं 50 धावा पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं देखील अर्धशतक झळकावलं आहे. फाफ डु प्लेसिसनं यंदाच्या आयपीएलमधील पहिलं अर्धशतक झळकावलं त्यानं 61 धावा केल्या. दिनेश कार्तिकनं 23 बॉलमध्ये 53 धावा केल्या.


ग्लेन मॅक्सवेल आजही अपयशी


आरसीबीचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आज देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस गोपालला पहिल्यांदा संधी दिली होती. श्रेयस गोपालनं ग्लेन मॅक्सवेलला शुन्यावर बाद केलं. विराट कोहली,रजत पाटीदार बाद झाल्यानंतर मॅक्सवेलकडून आरसीबीला मोठी आशा होती मात्र, ती पूर्ण होऊ शकली नाही. 


आरसीबीचं मुंबईपुढे किती धावांचं आव्हान ?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईपुढे 197 धावांचं आव्हान ठेवलं. मुंबईच्या जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल, जेम्स कोत्झी,आकाश मढवालनं आरसीबी विरुद्ध टिच्चून बॉलिंग केली. मात्र, फाफ डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिकनं जोरदार फलंदाजी केली. 


जसप्रीत बुमराहनं आरसीबीच्या धावसंख्येला ब्रेक लावला


मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहनं आज देखील चांगली कामगिरी केली. राजस्थान विरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या विराटला बुमरहानं तीन धावांवर बाद केलं. यानंतर आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसला देखील बुमराहनं बाद केलं. बुमराहनं महिपाल लोम्रोररला शुन्यावर बाद केलं.  बुमराहनं यानंतर सौरव चव्हाण आणि विजय व्यषकला देखील बाद केलं. 


संबंधित बातम्या : 


MI vs RCB Toss Update : मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, हार्दिकनं टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय


Mumbai Indians: मुंबईची ताकद वाढणार, बंगळुरु विरुद्ध भिडण्याअगोदर वर्ल्ड कप विजेता खेळाडू ताफ्यात, हार्दिक पांड्याचं टेन्शन मिटणार