मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चं नेतृत्त्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करत आहे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा टीम मॅनेजमेंटचा निर्णय आवडला नव्हता. रोहित शर्मानं (Rohit Sharma) मुंबईला पाचवेळा आयपीएल ट्रॉफी (IPL ) मिळवून दिल्यानंतरही त्याला कर्णधार पदावरुन काढण्यात आल्यानंतर चाहत्यांनी रोष व्यक्त केला होता. आज मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमध्ये पाचव्या मॅचमध्ये कप्तानी करत आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबईनं तीन पराभव आणि एक विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धूनं मोठं वक्तव्य केलं आहे. नवज्योत सिंह सिद्धून इंडिया टुडेसोबत बोलताना मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा, विराट कोहली, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि हार्दिक पांड्याबाबत वक्तव्य केलं आहे.
नवज्योत सिंह सिद्धूनं हार्दिक पांड्या हा भविष्यात भारतीय क्रिकेट टीमचा टी-20 मधील कॅप्टन असेल, असं म्हटलं. याशिवाय विराट कोहली संघात असूनही आरसीबीनं आतापर्यंत एकदाही ट्रॉफी का जिंकली नाही, असा सवाल सिद्धूनं केला.
मुंबई इंडियन्सचा विद्यमान कॅप्टन हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. रोहित शर्मा वर्तमान असून त्याचं वय सध्या 36 ते 37 वर्ष आहे. पुढील दोन वर्ष तो क्रिकेट खेळू शकेल. तो चांगला कॅप्टन आणि खेळाडू आहे. आपल्याला रोहित शर्मानंतर टीमचं कॅप्टनपद स्वीकारणारा खेळाडू तयार करायचा असल्याचं सिद्धू म्हणाला.
हार्दिक पांड्याला कसोटीचं कर्णधार पद द्यावं असं मी म्हणत नसून ज्यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली उपलब्ध नव्हते त्यावेळी त्यानं एक वर्ष टी-20 संघाचं नेतृत्त्व केलं आहे. बीसीसआयनं याबाबत खूप काम केलं असून टीम इंडियाच्या कॅप्टनपदासाठी हार्दिक पांड्या योग्य पर्याय असल्याचं सिद्धू म्हणाला.
सिद्धूनं कसोटी क्रिकेट संदर्भात एक दावा केला आहे. तुम्ही जेव्हा कसोटीचा विचार करता तेव्हा बीसीसीआयनं एक प्लॅन करुन ठेवला आहे, तो म्हणजे जसप्रीत बुमराह आहे, कोहली, धोनी संदर्भात बोलतो पण जसप्रीत बुमराह तुमच्या अपेक्षांचा दबाव योग्यरित्या हाताळतो. बुमराहनं इंग्लंडमध्ये कप्तानी केली होती, असंही सिद्धू म्हणाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. आरसीबीला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. याबाबत देखील सिद्धूनं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीनं या संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे आता फाफ डु प्लेसिस बंगळुरुचा कॅप्टन आहे. सिद्धूनं याबाबत म्हटलं की कोहली एकटा लढताना दिसतो, त्याला कोण साथ देत नाही त्यामुळं आरसीबीची स्थिती खराब आहे.
संबंधित बातम्या :