IPL 2024 KL Rahul LSG Captaincy: लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यातील मॅचनंतर केएल राहुल (KL Rahul) आणि संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. 


लखनौ सुपर जाएंटसचे मालक संजीव गोयंका यांनी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुलला ऑन कॅमेरा जाब विचारला होता. यावरुन संजीव गोयंका यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. हैदराबादविरुद्धचा लाजिरवाणा पराभव आणि संजीव गोएंका वादानंतर केएल राहुलच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राहुल आता कर्णधारपद सोडणार असून उर्वरित सामन्यांसाठी निकोलस पूरनकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र आता लखनौ व्यवस्थापनानेच्या एका अधिकाऱ्याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


व्यवस्थापनाने या प्रकरणाला पूर्णविराम दिला


आता हे सर्व वृत्त लखनौ संघ व्यवस्थापनाने फेटाळून लावले आहे. संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या ते कर्णधाराला हटवण्याचा अजिबात विचार करत नाहीत. तो म्हणतो की, संघाचे लक्ष सध्या प्लेऑफमध्ये जाण्यावर आहे. "आम्ही आमच्या कर्णधाराला पद सोडण्यास का सांगू आणि तसे करण्याची काय गरज आहे? आम्ही आमच्या पुढच्या सामन्याचा विचार करत आहोत. कर्णधार बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही", असं लखनौ संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


गुणतालिकेत लखनौ कोणत्या स्थानी?


गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्सची स्थिती सध्या खराब आहे. संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण जात आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. या 12 सामन्यांमध्ये लखनौला 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, तर 6 सामन्यात विजय मिळवला. -0.769 च्या नेट रनरेटसह, लखनौ सुपर जायंट्सचे 12 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत.


लखनौ सुपर जायंट्सचा पुढचा सामना...


लखनौ सुपर जायंट्सचा पुढील सामना 14 मे रोजी आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या होम ग्राउंडवर होणार आहे. यानंतर लखनऊचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 17 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.


संबंधित बातम्या:


'माझी भूमिका नव्हती...'; इशान अन् श्रेयसला करारातून कोणी काढले?, जय शहा यांनी नाव सांगितले!


Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?