IPL Final KKR vs SRH चेन्नई : कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबादला आठ विकेटनं पराभूत केलं. केकेआरनं आयपीएलच्या (IPL) इतिहासात तिसरं विजेतेपद मिळवलं आहे. केकेआरच्या खेळाडूंनी सांघिक  कामगिरीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं. कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्त्व श्रेयस अय्यर करत होता.तर, सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स होता. आयपीएलच्या 17 व्या पर्वातील फायनल आणि डब्ल्यूपीएलमधील फायनलमधील सारख्या गोष्टी समोर आल्या आहेत. डब्ल्यूपीएलच्या (WPL) फायनलमध्ये दिल्ली आणि बंगळुरुचा संघ आमने सामने आले होते. डब्ल्यूपीएलच्या फायनलमध्ये दिल्लीचं नेतृत्त्व मेग लॅन्निंग करत होती जी ऑस्ट्रेलियाची होती. इकडे सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व पॅट कमिन्स करतोय. तो देखील ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. 


थक्क करणाऱ्या 'चार' गोष्टी सेम टू सेम!


डब्लूयपीएलच्या फायनलमध्ये दिल्लीचा संघ 18.3 ओव्हरमध्ये 113 धावा करु शकला होता. आयपीएलच्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादचा संघ देखील 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर बाद झाला. 


डब्ल्यूपीएलची फायनल 17 मार्च रोजी पार पडली होती. या फायनलमध्ये आरसीबीच्या टीमचं नेतृत्त्व भारताची आक्रमक क्रिकेटपटू स्मृती मानधाना करत होती. आयपीएलच्या फायनलमध्ये केकेआरचं नेतृत्त्व श्रेयस अय्यरनं केलं. 


आरसीबीनं डब्ल्यूपीएलच्या फायनलमध्ये दिल्लीला 8 विकेटनं पराभूत केलं होतं. इकडे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वातील सनरायजर्स हैदराबादला 8 विकेटनं पराभूत करत विजय मिळवला आहे. 


दरम्यान, पॅट कमिन्स आणि मेग लॅन्निंग या दोघांनी देखील आयसीसीच्या स्पर्धांमध्ये फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केलेलं आहे. 2023 ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा असो की वनडे वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला पराभूत केलं. तर, मने लॅन्निंगच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियन महिला संघानं 2022 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाला पराभूत केलं होतं. 


बीसीसीआयनं आयपीएल प्रमाणं यंदा महिला  क्रिकेटपटूंसाठी डब्ल्यूपीएल सुरु कोलं होतं. या स्पर्धेला देखील भारतातील क्रिकेट चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. डब्ल्यूपीएलची फायनल बंगळुरुनं जिंकली. तर, आयपीएलची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएलच्या  सतराव्या पर्वाचं विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सनं पटकावलं आहे. तर, सनरायजर्सचा संघ उपविजेता बनला.  


कोलकाता नाईट रायडर्सला तिसऱ्यांदा विजेतेपद


कोलकाता नाईट रायडर्सनं यापूर्वी 2012 आणि 2014 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. गौतम गंभीर त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन होता. यावेळी मेंटॉर म्हणून गंभीर पुन्हा केकेआरसोबत जोडला गेला आणि केकेआरनं इतिहास रचत आयपीएल ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरलं. 


संबंधित बातम्या : 


 'ज्याचे विचार अन्...' कोलकाताच्या विजयानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया; चर्चांना उधाण


IPL 2024 Catch Of The Season: चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; यंदा रमणदीप 'Catch Of The Season'चा ठरला मानकरी, पाहा Video