Gautam Gambhir return to KKR as Mentor: टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मार्गदर्शक (KKR Mentor) असेल. याआधी तो लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाच्या मेंटरची भूमिका बजावत होता.


आयपीएल 2023 च्या समारोपानंतर, गौतम गंभीरनं शाहरुख खानची भेट घेतली होती, तेव्हापासूनच गौतम गंभीर आयपीएल 2024 साठी कोलकाता संघात सामील होऊ शकतो, अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान, गौतमनं यापूर्वीही केकेआरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. गौतमच्या नेतृत्त्वात कोलकातानं एकदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. 



KKR चे CEO वेंकी म्हैसूर यांनी आज (बुधवार, 22 नोव्हेंबर) याबाबत अधिकृत घोषणा केली. माजी भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीर KKR मध्ये 'मेन्टॉर' म्हणून परत येईल आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासोबत काम करेल. 






लखनौ सुपर जायंट्सचे मेंटॉरशिप सोडल्यानंतर गौतम गंभीरनंही एक इमोशन पोस्ट शेअर केली आहे. ज्यावरुन लखनौची साथ सोडणं गौतमला फारच अवघड जात असल्याचं दिसून येत आहे. 


गौतमनं एक ट्वीट केलं आहे. त्यानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "लखनौ सुपर जायंट्ससोबतचा माझा प्रवास संपलाय. मला लखनौचे खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघ सर्वांचा पाठिंबा मिळाला. मी डॉ. संजीव गोयंका (लखनौ संघाचे मालक) यांचे मनापासून आभार मानू इच्छितो."