कोलकाता : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची स्थिती अत्यंत वाईट आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानी संघाने अशाप्रकारे आपला ट्रॅक गमावला की उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानी संघाने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज सातव्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरली आहे.


बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाच्या खराब स्थितीमुळे देशभरातून टीका होत आहे. सोशल मीडिया आणि टीव्ही शोमधून माजी क्रिकेटपटू पाकिस्तानी संघावर टीका करत आहेत. आता त्या यादीत 1992 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रमीझ राजाचे नावही जोडले गेले आहे.


रमीझ राजा सध्या भारतात आहेत. रमीझ स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री पॅनलचा भाग आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात रमीझ कॉमेंट्री करत आहेत. मात्र मॅच सुरू होण्यापूर्वी त्याने जे काही सांगितले ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






नाणेफेकीच्या आधी संजय मांजरेकर यांनी त्यांना विचारले, '1992 मध्ये इम्रान खानने जे केलं ते मिकी आर्थर करू शकतो का?' यावर रमीज राजा म्हणाले, 'मी यावर हसू शकतो का, असे करण्याची परवानगी आहे का?' रमीझ राजा यांनी दिलेल्या या उत्तराने बाबर आझमला चांगल्याच मिरच्या झोंबल्या असतील, अशी चर्चा सुरु झाली. बाबर आझमवर पाकिस्तानमध्ये सर्वाधिक टीका केली जात आहे. 






1992 मध्ये पाकिस्तान चॅम्पियन झाला होता


पाकिस्तान क्रिकेट संघ 1992 मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली विश्वविजेता बनला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा 22 धावांनी पराभव केला. या सामन्यात इम्रान खानने दमदार कामगिरी दाखवली. संपूर्ण स्पर्धेत त्याने केवळ आपल्या खेळातूनच नव्हे तर आपल्या कर्णधारपदाद्वारे पाकिस्तानी संघाला ऊर्जा देण्याचे काम केले. 






अंतिम फेरीत इम्रान खानने दमदार कामगिरी दाखवत 72 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या खेळीत त्याने 110 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. फलंदाजीसोबतच त्याने गोलंदाजीतही एक विकेट घेतली.


इतर महत्वाच्या बातम्या