Mumbai Indians, Hardik Pandya IPL 2024 : आयपीएल 2024 साठी कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या संघासोबत जोडला गेलाय. मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये चेन्नईत सलामीचा सामना रंगणार आहे. आयपीएल 2024 साठी हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मुंबईने आपल्या तयारीला सुरुवात केली असून कॅम्पमध्ये एक एक करुन सर्व खेळाडू दाखल होत आहेत. 


भगवान गणेशाची पूजा - 


कर्णधार हार्दिक पांड्याचं मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये जल्लोषात स्वागत केले. कॅम्पची सुरुवात करण्यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून भगवान गणेशाची पूजा करण्यात आली. कर्णधार हार्दिक पांड्यानं भगवान गणेशाला पूष्पहार अर्पण केला. त्यानंतर दीपप्रज्वलीत केले. मुंबईचा मुख्य कोच मार्क बाऊचर यानं नारळ फोडला. याचा व्हिडीओ मुंबईने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 






गुजरातच्या ताफ्यातून मुंबईत - 


आयपीएल 2022 आधी मुंबईने हार्दिक पांड्याला रिलीज केले होते. त्यानंतर तो गुजरातच्या ताफ्यात दाखल झाला होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने दोन हंगामात शानदार कामगिरी केली. तोन्ही वेळा गुजरातने फायनलमध्ये धडक मारली होती. त्यामुळेच 2024 आयपीएलआधी मुंबईने हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड केले. त्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली. 
 


रोहित शर्माला डावललं, हार्दिकला कर्णधार केलं


आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्स संघानं मोठा निर्णय घेतला. मुंबईने रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हाकालपट्टी केली. मुंबईने गुजरातकडून आयात केलेल्या हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवली. मुंबईने आयपीएल लिलावाआधी हार्दिक पांड्याला कॅश डीलमध्ये ट्रेड केले होते. त्यानंतर काही दिवसांतच मुंबईने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून जाहीर केले.


Mumbai Indians Players : मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?


आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (कर्णधार), गेराल्ड कोएत्जी,  नुवान तुषारा, दिलशान मधुशंका, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज, शिवालीक शर्मा 


Mumbai Indians Players: Akash Madhwal, Arjun  Tendulkar, Dewald Brevis, Ishan Kishan, Jason Behrendorff, Jasprit Bumrah, Kumar Kartikeya Singh, N. Tilak Varma, Nehal Wadhera, Piyush Chawla, Rohit Sharma, Romario Shepherd (T), Shams Mulani, Surya Kumar Yadav, Tim David, Vishnu Vinod, Hardik Pandya (C), Gerald Coetzee, Nuwan Thushara, Dilshan Madushanka, Mohammad Nabi,Shreyas Gopal, Naman Dhir, Anshul Kamboj,Shivalik Sharma  


मुंबई इंडियन्सचं सुरुवातीच्या सामन्याचं वेळापत्रक - 


गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता


सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता


मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता


मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता