IPL 2024 CSK vs PBKS MS Dhoni: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या मोसमात, चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पंजाब किंग्सविरुद्ध (PBKS) 28 धावांनी विजय नोंदवून प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. या सामन्यात सीएसके संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 166 धावा केल्या परंतु आतापर्यंत या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसणारा एमएस धोनी (MS Dhoni) खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. धोनीला पहिल्याच चेंडूवर हर्षल पटेलने त्रिफळाचीत केले. 

Continues below advertisement

एमएस धोनीसारख्या दिग्गज खेळाडूची विकेट घेतल्यानंतरही हर्षल पटेलने आनंद साजरा केला नाही. सामना संपल्यानंतर हर्षल पटेल याबाबत खुलासा केला. धोनीबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि त्यामुळेच त्याची विकेट घेतल्यानंतर मी सेलिब्रेशन केले नाही. त्याच्या गोलंदाजीबाबत हर्षल म्हणाला की, दुपारच्या वेळेत गोलंदाजी केल्याने तुम्हाला चेंडू स्लोअर टाकण्याची संधी मिळते आणि मी नेटमध्ये माझ्या स्लोअर चेंडूचा सतत सराव करतो, जे फलंदाजांना समजणे थोडे कठीण असते. हर्षलने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा धोनीला आपला शिकार बनवले आहे.

धोनी शून्यावर बाद-

आयपीएलच्या या मोसमात, धोनी सीएसकेच्या डावातील शेवटची काही षटके फलंदाजीसाठी येत आहे, त्यामुळे पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात आला तेव्हा फक्त 7 चेंडू खेळायचे बाकी होते. हर्षलने एक संथ चेंडू धोनीकडे टाकला, त्यावर त्याने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही आणि चेंडू थेट स्टंपवर आदळला. 

Continues below advertisement

चेन्नईने विजयासह टॉप-4 गाठले

पंजाब किंग्ज विरुद्धच्या या सामन्यात एके काळी 167 धावा करून चेन्नई सुपर किंग्जचा विजय जरा अवघड वाटत होता, पण रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने पंजाबचा 139 धावांनी पराभव केला.हा सामना जिंकून चेन्नई पुन्हा एकदा 12 गुणांसह आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत टॉप-4 मध्ये पोहोचले आहे.

गुणतालिकेची काय स्थिती?

आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ पहिल्या स्थानावर आहे. कोलकाताचे सध्या 16 गुण आहेत. तर राजस्थानचा संघही 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून हैदराबादचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौचा 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर, दिल्ली 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरु 8 गुणांसह सातव्या क्रमांकावर असून बंगळुरुने 11 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. तर पंजाबचा संघ आठव्या स्थानावर, गुजरातचा संघ नवव्या क्रमांकावर आणि मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या:

IPL 2024: इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमधील प्ले ऑफच्या फेरीत खेळणार की मायदेशी परतणार?; पाकिस्तानमुळे टांगती तलवार

Sunil Gavaskar On Virat Kohli: 'अरे मग तु उत्तर का देतोस'?; विराट कोहलीच्या विधानावर सुनील गावसकर संतापले, पाहा Video

Hardik Pandya: हार्दिक पांड्याची मोठी चूक झाली...; शेन वॉटसन अन् ग्रॅमी स्मिथने सुनावलं, सगळं बोलून टाकलं!