GT vs CSK live Score IPL 2024: गुजरातचा चेन्नईवर 35 धावांनी विजय
GT vs CSK Live Score, IPL2024 : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहेत. आज आयपीएलमधील 59 वी मॅच आहे.
गुजरातने चेन्नईवर 35 धावांनी विजय मिळवला आहे.
चेन्नईला विजयसाठी 6 चेंडूत 52 धावांची गरज आहे. गुजरातने विजय पक्का केली आहे.
चेन्नईला पाचवा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू मोईन अली झेलबाद झाला आहे.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड बाद झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्सला दुसरा धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणे झेलबाद झाला आहे. चेन्नईला 2 धावांवर दोन धक्के बसले आहेत.
चेन्नई सुपर किंग्सला पहिला धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा रचिन रवींद्र धावबाद झाला.
गुजरातने 20 षटकांत 231 धावा केल्या.
गुजरातला दुसरा धक्का बसला आहे. गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिल बाद झाला आहे.
गुजरातला पहिला धक्का बसला आहे. गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन 103 धावा करत बाद झाला आहे.
साई सुदर्शनने देखील शतक झळकावलं आहे.
शुभमन गिलने दमदार शतक झळकावलं आहे. यामध्ये 6 षटकार आणि 9 चौकार टोलावले.
गुजरातच्या साई सुदर्शन आणि शुभमन गिलने अर्धशतक झळकावले आहे.
गुजरातने 10 षटकांत 107 धावा केल्या आहेत.
गुजरातने आक्रमक सुरुवात केली आहे. 5 षटकांत गुजरातने 46 धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्सला चेन्नई सुपर किंग्जनं गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या फायनलमध्ये पराभूत केलं होतं. यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये झालेल्या लीग मॅचमध्ये गुजरातला चेन्नईनं पराभूत केलं होतं.
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये 6 मॅचमध्ये आमने सामने आले होते. दोन्ही संघांनी 3-3 मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
गुजरात टायटन्सचे यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 7 पराभव झाले आहेत. आजच्या मॅचमध्ये विजय न मिळाल्यास त्यांचा आयपीएलबाहेर जाणारा तिसरा संघ असेल.
चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये 11 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. प्लेऑफच्या दृष्टीनं चेन्नईसाठी महत्त्वाची मॅच आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेचा फॉर्म कॅप्टन ऋतुराज गायकवाडसाठी चितेंचा विषय ठरला आहे. चेन्नई अजिंक्य रहाणेवर विश्वास ठेवत त्याला संधी देत आहे.
पार्श्वभूमी
GT vs CSK Live Score Updates, IPL2024 : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहेत. गुजरातनं विजयानं आयपीएलची सुरुवात केली होती. मात्र,त्यानंतर त्यांना कामगिरीत सातत्या राखता आलं नव्हतं. चेन्नईसाठी प्लेऑफच्या दृष्टीनं आजच्या मॅचमधील विजय महत्त्वाचा ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्जनं 11 मॅच खेळल्या असून त्यांना 6 मॅचमध्ये विजय मिळाला आहे तर 5 मॅचमध्ये पराभव झाला आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सचा 11 पैकी 7 मॅचमध्ये पराभव झाला आहे. तर, 4 मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -