Fastest 50 in IPL: युवा फलंदाज अभिषेक शर्माने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अभिषेक शर्माने यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले. अभिषेक शर्माने 16 चेंडूत अर्धशतक ठोकले. अभिषेक शर्माने अवघ्या 30 मिनिटांमध्ये ट्रेविस हेडचा विक्रम मोडला. ट्रेविस हेडने आजच्या सामन्यातच 18 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. हे यंदाच्या आयपीएलमधील वेगवान अर्धशतक होतं. हा विक्रम अभिषेक शर्माने मोडला. अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक ठोकले.


अभिषेकचं वेगवान अर्धशतक - 


अभिषेक शर्माने ट्रेविस हेडच्या साथीने हैदराबादची धावसंख्या वाढवली. अभिषेकने 16 चेंडूमध्ये  6 षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. त्याने चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. अभिषेक शर्माच्या खेळीच्या बळावर हैदराबादन 10 षटकात 148 धावा केल्या आहेत. 






हेडसोबत मोठी भागिदारी - 


ट्रेविस हेड आणि मयांक अग्रवाल यांन आक्रमक सुरुवात केली. 4.1 षटकांमध्ये 45 धावांची सलामी दिली. मयांक अग्रवालयाला पांड्याने तंबूचा रस्ता दाखवला. मयांक फक्त 11 धावा काढून बाद झाला. त्यानंतर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी चार्ज घेतला. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. ट्रेविस हेड याने 24 चेंडूमध्ये 62 धावांचे योगदान दिले. ट्रेविस हेड याने आपल्या खेळीमध्ये तीन षटकार आणि 9 चौकार लगावले. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांच्यामध्ये 23 चेंडूमध्ये 68 धावांची भागिदारी झाली. 


हेड बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने एडन मार्करम याच्यासोबत धावसंख्या हालती ठेवली. मार्करम आणि अभिषेक शर्मा यांनी 17 चेंडूमध्ये 46 धावांची भागिदारी केली. यामध्ये अभिषेक शर्माने 10 चेंडूमध्ये 29 धावांचे योगदान दिले. मार्करम 7 चेंडूमध्ये 17 धावा काढून खेळत आहे. हैदराबादने 11 षटकात 3 बाद 167 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा 23 चेंडूमध्ये 63 धावा काढून बाद झाला. 






मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 - 


इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार) , टीम डेविड, सॅम्स मुलानी, गेराल्ड कोएत्जे, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, केविन माफाका


सनराजयर्स हैदराबादची प्लेईंग 11 - 


ट्रेविस हेड, मयांक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयांक मार्केंडे, जयदेव उनादकट