विशाखापट्टणम : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात 16 वी मॅच पार पडली. या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार  श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरनं फलंदाजीची सुरुवात आक्रमक केली. केकेआरचे सलामीवीर फिलीप सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागिदारी केली. यानंतर सुनील नरेन, रघुवंशी, आंद्रे रसेल, (Andre Russell)  श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग यांनी जोरदार फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या जोरावर  कोलकाता नाईट रायडर्सनं  7 बाद 272 धावांपर्यंत मजल मारली. 


केकेआरनं 19 व्या ओव्हरपर्यंत 5 बाद 264 धावा केल्या होत्या. रिंकू सिंग 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला होता. 20 व्या ओव्हरमध्ये केकेआरची टीम सनरायजर्सचा 277 धावांचा विक्रम मोडणार असं सर्वांना वाटत होतं. आंद्रे रसेलनं 18 बॉलमध्ये 41 धावा केल्या होत्या.  रिषभ पंतनं यावेळी टीमचा सर्वात अनुभवी बॉलर ईशांत शर्माला बॉलिंग दिली. 20 व्या ओव्हरमध्ये दिल्लीसमोर आंद्रे रसेलला रोखण्याचं आव्हान होतं. ईशांत शर्मानं रिषभ पंतचा विश्वास सार्थ ठरवला. आंद्रे रसेलला ईशांत शर्मानं (Ishant Sharma) यॉर्कर टाकला. हा यॉर्कर थेट स्टम्पवर जाऊन आदळला. यॉर्करपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात  आंद्रे रसेल खाली कोसळला. 






आंद्रे रसेलकडून ईशांत शर्माचं कौतुक


आंद्रे रसेलनं 19 बॉलमध्ये 3 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीनं 41 धावा केल्या होत्या. कोलकाताला रसेलकडून अखेरच्या ओव्हरमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, ईशांत शर्मानं टाकलेल्या यॉर्करपुढं आंद्रे रसेलचा निभाव लागला नाही. बॉल अडवण्याच्या नादात तो खाली कोसळला. तोपर्यंत  बॉल स्टम्पवर जाऊन आदळला होता. यानंतर रसेलनं टीम स्पिरीट दाखवत ईशांत शर्माचं अभिनंदन केलं. 


ईशांत शर्मानं अनुभव पणाला लावला, केकेआरची संधी हुकली


सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्स विरुद्ध 3 बाद 277 धावा केल्या होत्या.  केकेआर त्यापेक्षा अधिक धावा करेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ईशांत शर्मानं पहिल्या बॉलवर आंद्रे रसेलला बाद केलं. त्यानंतर रमनदीप सिंगला देखील ईशांत शर्माच्या बॉलिंगवर बाद झाला. अखेरच्या ओव्हरमध्ये ईशांतनं 8 धावा देत दोन विकेट घेतल्यानं केकेआरला 7 बाद 272  धावा करता आल्या. सुनील नरेननं 85  तर अंगकृष रघुवंशीनं 45 धावा केल्या. याशिवाय रिंकू सिंगनं देखील 19 व्या ओव्हरमध्ये जोरदार फटकेबाजी केली. 


संबंधित बातम्या :


KKR vs DC : सुनील नरेन ते आंद्रे रस्सेलचं वादळ,केकेआरचा दिल्लीपुढं धावांचा डोंगर,रिषभ सेनेला विजयसाठी किती धावा कराव्या लागणार?


DC vs KKR : श्रेयसनं टॉस जिंकला, कोलकाताचा पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय, विजयाची मालिका सुरु ठेवणार?