विशाखापट्टणम : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात मॅच होणार आहे. दोन्ही संघ तामिळनाडूच्या विशाखापट्टणममध्ये आमने सामने येत आहेत. दिल्ली कॅपिटल्सची आजची मॅच चौथी आहे तर कोलकाता नाईट रायडर्सची तिसरी मॅच आहे. केकेआरनं यापूर्वी दोन मॅच जिंकल्या आहेत. तर दिल्लीला यंदा एक विजय मिळाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीनं मुकेश कुमारच्या जागी सुमित कुमारला संधी दिली आहे. 



दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्या दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत केलं होतं. दिल्लीचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. दिल्लीला रिषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. या तिघांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. 



श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकातानं पहिल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबाद तर दुसऱ्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सच्या फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. 


केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स यापूर्वी 32 वेळा आमने सामने आले आहेत. त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं 16 वेळा विजय मिळवला तर दिल्ली कॅपिटल्सनं 15 वेळा विजय मिळवला आहे. आता आजच्या मॅचमध्ये को विजय मिळवणार हे पाहावं लागेल. दिल्ली कॅपिटल्सनं यापूर्वीच्या सलग तीन मॅचेसमध्ये केकेआरला पराभूत केलं आहे. 


केकेआरचा विजय रथ रोखण्याची दिल्लीला संधी


कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्या दोन मॅचमध्ये विजय मिळवलेला आहे.दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सला मुंबईला पराभूत केल्यानं सूर गवसलेला आहे. आता आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत दिल्ली केकेआरचा विजयरथ रोखणार का हे पाहावं लागणार आहे.  श्रेयस अय्यरच्या केकेआरकडे आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर जाण्याची संधी आहे. केकेआर दिल्लीला पराभूत करण्यात यश मिळवणार का हे पाहावं लागणार आहे. 


दिल्लीची टीम : 



ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ॲनरिक नॉर्टजे, सुमित कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद 


केकेआरची टीम : 


फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि अंगक्रिश रघुवंशी 


संबंधित बातम्या :


ट्रोलिंग, अपमान, डिवचलं....; मुंबईच्या सलग 3 पराभवानंतर हार्दिकने अखेर मौन सोडलं, काय म्हणाला?


Mayank Yadav LSG: राजनाधी एक्सप्रेस...फक्त दोन सामने खेळला अन् मयंक यादवने स्वत:चाच विक्रम मोडला!