नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात काल आयपीएलमधील  40 वी मॅच पार पडली. या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला 4 धावांनी पराभूत केलं. आयपीएलच्या सुरुवातीला पराभवाचा सामना करणाऱ्या दिल्लीच्या टीमनं गेल्या चार मॅचपैकी तीन मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे. दिल्लीच्या या विजयामध्ये कॅप्टन रिषभ पंतचं (Rishabh Pant) मोठं योगदान आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचा मेंटर सौरव गांगुली (Sourav Ganguly) देखील रिषभ पंतवर भलताच खूश आहे. सौरव गांगुलीनं दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतसाठी स्टँडिंग ओवेशन दिलं. 


नेमकं काय घडलं?


दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंतनं महेंद्रसिंह धोनीचा ट्रेडमार्क शॉट असलेला हेलिकॉप्टर शॉट गुजरातच्या मोहित शर्माला मारला. रिषभ पंतनं 16 व्या ओव्हरमध्ये गुजरातच्या मोहित शर्माला हेलिकॉप्टर शॉट मारला. रिषभ पंत त्यावेळी 34 धावांवर खेळत होता. रिषभ पंतनं मोहित शर्माला हेलिकॉप्टर शॉट मारताच आनंदी झालेल्या सौरव गांगुली स्वत:ला रोखू शकला नाही. सौरव गांगुलीनं उभं राहत टाळ्या वाजत रिषभ पंतला स्टँडिंग ओवेशन दिलं.हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.     






 
रिषभ पंत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर


दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतनं गुजरात विरोधात 88 धावांची खेळी केली. या धावसंख्येच्या जोरावर रिषभ पंतनं ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. रिषभ पंतच्या नावावर 342 धावा आहेत. तर, दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऋतुराज गायकवाडच्या नावावर 348 धावा असून पहिल्या स्थानावर असलेल्या  विराट कोहलीच्या नावावर 379 धावा आहेत. 


दिल्लीला गुजरातच्या संदीप वॉरिअरनं तीन धक्के दिले होते. दिल्लीची अवस्था 3 बाद 44 अशी झाली होती. रिषभ पंतनं पाचव्या स्थानावर फलंदाजीला येत अक्षर पटेलच्या साथीनं 113 धावांची भागिदारी केली आणि संघाला 4 बाद 224 धावांपर्यंत नेऊन ठेवलं. गुजरात टायटन्सचा संघ 8 बाद 220 धावा करु शकला.  


रिषभ पंतचे दिल्ली कॅपिटल्ससाठी 150 षटकार


रिषभ पंतनं कालच्या मॅचमध्ये 8 षटकार मारले. या आठ षटकारांच्या जोरावर पंतनं दिल्लीसाठी 150 षटकारांचा टप्पा पार केला. दिल्ली कॅपिटल्ससाठी 150 सिक्स मारणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.


संबंधित बातम्या :


MS Dhoni : धोनीचा एक पठ्ठ्या डबल धमाका करणार?, पांड्या जडेजा वर्ल्ड कपवारीला मुकणार? हे आहे कारण


 Rishabh Pant : रिषभ पंतला टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या स्थानावर संधी द्या, अन्यथा मोठी अडचण, दिग्गज खेळाडूनं कारण सांगितलं...