IPL 2024 Schedule Announcement Live Streaming : आयपीएलच्या 17 व्या हंगामाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आज आयपीएलचं वेळापत्रक (IPL 2024 Schedule) जाहीर होणार आहे. आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी दोन दिवसांपूर्वीच आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत अपडेट दिली होती. 22 मार्च पासून आयपीएलच्या रणधुमाळीला सुरुवात होईल, असे अरुण धुमाळ यांनी सांगितलं होतं. देशात यंदा लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्याचवेळी आयपीएलचा थरारही होणार आहे.


 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात करण्याची योजना असल्याचं अरुण धुमाळ यांनी सांगितलं. यंदाच्या आयपीएल हंगामाचं पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर होईल. उर्वरित सामन्याचे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीचा तारखा जाहीर झाल्यावर करण्यात येईल, असे धुमाळ यांनी सांगितलं. आज आयपीएलचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. कधी, कुठे आयपीएल वेळापत्रक पाहाता येईल.. याबाबत जाणून घेऊयात. 


आयपीएलचं वेळापत्रक कधी जाहीर होणार ? When will the IPL 2024 schedule be announced? 


22 फेब्रुवारी 2024 रोजी आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. 


आयपीएलचं वेळापत्रक किती वाजता जाहीर होणार ? What time will the IPL 2024 schedule be announced?


आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं वेळापत्रक आज सायंकाळी पाच वाजता जाहीर होणार आहे. 


 कोणत्या टिव्ही चॅनलवर आयपीएलचं वेळापत्रकाचं लाईव्ह प्रसारण करण्यात येईल ? Which TV channel will telecast the IPL 2024 schedule announcement?


स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर  (Star Sports Network ) आयपीएलचं वेळापत्रक लाईव्ह पाहता येईल.  


कोणत्या अॅपवर आयपीएलचं वेळापत्रकाचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल ? Where to follow the live streaming of the IPL 2024 schedule announcement?


आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं वेळापत्रक आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. जिओ सिनेमा अॅपवर मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.


 पहिला सामना कुणाचा ?


22 मार्चपासून आयपीएलच्या थराराला सुरुवात होणार आहे. साधारणपणे आयपीएलचा सलामीचा सामना गतविजेते आणि उप विजेते यांच्यामध्ये होतो. त्यानुसार, पहिला सामना धोनीच्या चेन्नई विरोधात शुभमन गिल याच्या गुजरात संघामध्ये होऊ शकतो. 


26 मे रोजी अखेरचा सामना - 


जूनमध्ये टी20 विश्वचषक पार पडणार आहे, त्यामुळे आयपीएल स्पर्धा मे अखेरपर्यंत संपेल.विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी असू शकतो. टी 20 विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना 5 जून रोजी होणार आहे. 1 जूनपासून टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. 


आणखी वाचा :


IPL 2024 : चेन्नई-गुजरातमध्ये पहिला सामना? IPL चा थरार 22 मार्चपासून, लोकसभा आणि आयपीएलची रणधुमाळी एकाचवेळी!