IPL 2024 CSK vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्सने (CSK)) संघ अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आमनेसामने आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात चांगली झाली. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विराट कोहलीने आपल्या नावावर केला खास विक्रम...
विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही मैदानावर 3 हजार धावा करण्याचा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आलेला नाही. आकडेवारीवर नजर टाकली तर विराट कोहलीच्या जवळ कोणीही नाही. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर 2295 धावा केल्या आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स आहे. एबी डिव्हिलियर्सने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 1960 धावा केल्या आहेत.
या खेळाडूंनी घरच्या मैदानाला बनवले गड!
त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरचे नाव या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर डेव्हिड वॉर्नरने 1623 धावा केल्या आहेत. या खेळाडूंनंतर ख्रिस गेल पाचव्या स्थानावर आहे. ख्रिस गेलने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 1561 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने चांगली फलंदाजी केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 251 सामन्यांमध्ये 131.95 च्या स्ट्राईक रेटने आणि 38.69 च्या सरासरीने 7971 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये 8 शतकांचा विक्रम आहे. तर या खेळाडूने 55 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.
बंगळुरूला चेन्नईविरुद्ध विजय आवश्यक-
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय आवश्यक आहे. बेंगळुरू 12 गुणांसह सहाव्या तर चेन्नई 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. बेंगळुरूचा नेट रन रेटही आरसीबीपेक्षा चांगला आहे. अशा परिस्थितीत आरसीबीसाठी केवळ सामन्यात विजय नोंदवणे महत्त्वाचे नाही, तर संघाला असा विजय नोंदवावा लागेल जेणेकरुन धावगतीच्या बाबतीतही चेन्नईला पराभूत करता येईल. उल्लेखनीय आहे की आरसीबीने गेल्या 5 सामन्यांमध्ये सलग विजय नोंदवले आहेत, जे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
संबंधित बातम्या:
आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार