IPL 2024: RCB Vs CSK Probable Playing XI: आयपीएल 2024 च्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिली लढत चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ लढतीसाठी सज्ज झाले आहेत. सीएसके आणि आरसीबीचा सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर होणार आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नईने आरसीबीवर वर्चस्व राखल्याचे रेकॉर्डमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आयपीएलच्या इतिहासात दोघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये सीएसकेने 20 जिंकले आहेत. तर, आरसीबीने केवळ 10 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. चेपॉकमध्ये दोन्ही संघांनी 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चेन्नईने 7 जिंकले आहेत, तर बेंगळुरूने फक्त 1 सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर वर्चस्व गाजवेल असे आमचे भाकीत केले जात आहे.
चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला दुखापत झाल्यामुळे किमान मे पर्यंत आयपीएल २०२४ पासून दूर राहणार आहे. त्यामुळे कॉनवेची जागा न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र घेईल. रचिन रवींद्रसोबत चेन्नईचा नवीन कर्णधार रुतुराज गायकवाड सलामीला उतरेल. तसेच आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांची जोडी सलामीला दिसेल. दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असेल, जाणून घ्या...
आरसीबीपुढे मोठे आव्हान-
'आरसीबी पुढे सर्वात मोठे आव्हान दडपण झुगारण्याचे असणार आहे. मजबूत फलंदाजी आणि दमदार अष्टपैलू खेळाडू असलेल्या 'आरसीबी'ची गोलंदाजी मात्र फारशी प्रभावी नाही. त्यामुळे फलंदाजांच्या कामगिरीवरच या संघाचे यश अवलंबून आहे. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस या केजीएफ' सूत्रावर आरसीबी संघाची वाटचाल होईल.
RCB Vs CSK संभाव्य Playing XI:
Royal Challengers Bengaluru : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरर, रीस टूली, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा
Chennai Super Kings: रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरिल मिशेल, एमएस धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान