AB de Villiers On Virat Kohli: भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. 35 वर्षीय कोहली जवळपास दोन महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. आता विराट कोहली आयपीएल 2024 मध्ये खेळणार असल्याबद्दल आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याचदरम्यान दक्षिण अफ्रिकेचा आणि आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीवर भाष्य केलं आहे. 






एबी डिव्हिलियर्स त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, 'विराट कोहली एक महान आहे, 7000 हून अधिक धावा, 200 आयपीएल सामने, हे खरोखर अविश्वसनीय आहे. तो जबरदस्त पुनरागमन करेल, आम्ही त्याला खूप मिस केले. आगामी हंगामात विराट कोहलीची सर्वोत्तम कामगिरी पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा भाग असलेल्या युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचंही (Yashasvi Jaiswal) एबी डिव्हिलियर्सने कौतुक केले.






यशस्वीकडून मोठ्या फटाक्यांची अपेक्षा- 


यशस्वी जैस्वाल हा एक खेळाडू आहे, ज्याला खेळताना पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. कसोटी फॉरमॅटमध्ये आपण काय करू शकतो हे त्याने दाखवून दिले. आता त्याला टी-20 क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्या कसोटी मालिकेतून त्याला खूप आत्मविश्वास मिळाला. यशस्वी जैस्वालकडून आयपीएलमध्ये मोठ्या फटाक्यांची अपेक्षा आहे. मला यशस्वी जैस्वालकडून 500 पेक्षा जास्त धावांची अपेक्षा आहे, असंही एबी डिव्हिलियर्सने सांगितलं.


संबंधित बातम्या:


IPL 2024: आयपीएल 2024चे जेतेपद कोण पटकावणार?; CSKच्या चाहत्यांना न आवडणारी सुरेश रैनाची भविष्यवाणी!


IPL 2024: Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अर्जुन तेंडुलकरहून लहान असलेल्या गोलंदाजाची एन्ट्री; विश्वचषकात प्रतिस्पर्धी संघावर पडला होता भारी


आयपीएलमध्ये ५ सामन्यात २ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची मोहम्मद शमीच्या जागी वर्णी; गुजरातची टायटन्सची घोषणा