IPL 2023 Arjun Tendulkar : इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League 2023) च्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आयपीएलमध्ये (Arjun Tendulkar IPL Debut) पदार्पण करू शकतो. आयपीएल (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक (MI Coach) मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी अर्जुन तेंडूलकरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मानं म्हटलं आहे की, व्यवस्थापनाच्या नजरा अर्जुनवर आहेत आणि त्याला यावर्षी प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागील दोन हंगाम मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र, अद्यापही अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पण करता आलेलं नाही. दोन्ही सीझन तो बेंचवर होता. त्यामुळे यंदा तरी अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळणार का? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा?
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक मार्क बाउचर यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, अर्जुनने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाज म्हणून त्याला संघात संधी दिली जाऊ शकते. अर्जुन त्याच्या वडिलांप्रमाणे स्पिनर नाही, पण तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तसेच तो फलंदाजीही करू शकतो. पण संघ त्याच्यासाठी काय योजना आखतो हे पाहावं लागणार आहे.
सचिन तेंडुलकरने दिली ही प्रतिक्रिया?
2022 च्या हंगाम संपल्यानंतर, जेव्हा मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरला अर्जुनबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला होता की, मी काय विचार करतो किंवा मला काय हवे आहे याने काही फरक पडत नाही. आताचा हंगाम संपला आहे. आता नव्या सीझनवेळी समजेल.
अर्जुन नुकताच दुखापतीतून सावरला
आयपीएल सुरु होण्यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला अर्जुनबाबत विचारल्यावर तो म्हणाला की, याबाबत अपेक्षा करू शकतो. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचरही उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की, अर्जुनने त्याच्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केलं आहे. त्यामुळे निश्चितपणे निवडीसाठी त्याचा विचार केला जाईल.
मार्क बाउचर पुढे म्हणाले की, 'अर्जुन नुकताच दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे तो काही दिवस खेळला नाही. मला वाटतं की तो गेल्या सहा महिन्यांत खूप चांगल्याप्रकारे खेळत आहे, विशेषतः त्याच्या गोलंदाजीचा फॉर्म चांगला आहे. जर त्याची निवड झाली तर संघासाठी फायदेशीर ठरेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : CSK चाहत्यांसाठी वाईट बातमी! धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर? समोर आली महत्वाची माहिती