IPL 2023 Mumbai Indians : आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची जोरदार तयारी सुरु आहे. मुंबई पलटनने स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) दमदार फलंदाजीचा व्हिडीओ शेअर करत 'सूर्या'च्या फलंदाजीची झलक दाखवली आहे. मुंबई इंडियन्स सध्या आयपीएल 2023 मध्ये पहिला विजय मिळवून खातं खोलण्याच्या तयारीत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) शनिवारी त्यांचा यंदाच्या मोसमातील दुसरा सामना खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरोधात हा सामना असेल.


IPL 2023 Mumbai Indians : सूर्यकुमारच्या दमदार फलंदाजीची झलक


दरम्यान, आगामी सामन्यासाठी रोहित शर्मासह सुर्यकुमार यादव तसेच सर्व फलंदाज आणि गोलंदाज सरावासाठी घाम गाळत आहेत. मुंबई इंडियन्सने ट्विटर अंकाऊंटवर नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुर्यकुमार धोबीपछाड फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. सूर्याने दमदार खेळी करत चेंडूवर चौकार आणि षटकार ठोकले आहेत.


पाहा व्हिडीओ : सुर्यकुमारची 'डॅशिंग' फलंदाजी






IPL 2023, MI vs CSK : मुंबई इंडियन्स पहिल्या विजयासाठी सज्ज


आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात मुंबई विजय मिळवण्यासाठी उतरणार आहे. मुंबईचा पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) पराभव झाला. आता शनिवारी 8 एप्रिल रोजी मुंबई आणि चेन्नई आमनेसामने असतील. हा मुंबई संघाचा दुसरा तर चेन्नई संघाचा तिसरा सामना असेल.


IPL 2023, MI vs RCB : आरसीबीकडून मुंबईचा 8 विकेट्नेस पराभव


आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान आरसीबीने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले.  मुंबईचा पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजायाने केली. तर मुंबईने नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावला आहे. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.


Mumbai Indians Team : मुंबई इंडियन्स संघ 


रोहित शर्मा, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, ऱ्हाय रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंह, शम्स मुलानी, नेहल कुमार वधेरा, हृतिक शोकीन, आकाश मधवाल, अर्शद खान, राघव गोयल, डुआन जॅनसेन, ट्रिस्टन स्टब्स, आणि विष्णू विनोद


महत्त्वाच्या इतर बातम्या :


World Cup 2023 : विश्वचषकाआधी न्यूजीलंडला मोठा झटका, आयपीएलमध्ये दुखापत झालेला केन विल्यमसन वर्ल्ड कपला मुकणार