SRH vs LSG, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आज लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. हैदराबादमधील (Hyderabad) राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium) दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. आयपीएल गुणतालिकेत लखनौ सध्या पाचव्या स्थानावर तर हैदराबाद नवव्या स्थानावर आहे.


लखनौ विरुद्ध हैदराबाद


लखनौ(LSG) संघांने मागील सलग तीन सामने गमावले आहेत, लखनौ संघाचा मूळ कर्णधार केएल राहुल (KL Rahul Ruled Out of IPL) आयपीएलमधून बाहेर गेल्यावर संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यासाठी संघाला आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. त्याउलट हैदराबाद (SRH) संघ अलिकडे चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून संघाने मागील तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. लखनौ (LSG) विरुद्धच्या सामना जिंकल्यास हैदराबाद (SRH) संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा आशा कायम ठेवून आहे.






हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनराजयर्स हैदराबाद (SRH) संघ एकूण दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारड जड आहे. लखनौ संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत, तर हैदराबाद संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. आयपीएल 2023 मधील दहाव्या सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, या सामन्यात लखनौ संघाने हैदराबादचा पाच विकेट्सने पराभव केला.


पॉईंट टेबलची काय स्थिती? 


गुजरातचा संघाने 12 सामन्यात आठ विजय मिळवलेत. गुजरात 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नईने 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता. चेन्नईचे 15 गुण आहेत.  मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. मुंबईने 12 सामनयात सात विजय मिळवलेत.  राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय. राजस्थानने 12 सामन्यात सहा विजय मिळवत 12 गुणांची कमाई केली आहे. त्याशिाय लखनौचा संघाने 11 सामन्यात 11 गुणांची कमाई केली आहे. 


IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज 13 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023 Points Table : मुंबईच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल, राजस्थानची घसरण तर...