LSG vs SRH, 1 Innings Highlight: हैदराबादच्या फिरकीपुढे हैदराबादचे फलंदाजांची दाणादाण उडाली. निर्धारित 20 षटकात हैदराबादने 8 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा केल्या. हैदराबादच्या तीन फिरकी गोलंदाजांनी हैदराबादच्या सहा गड्यांना तंबूत पाठवले. कृणाल पांड्या, अमित मिश्रा आणि रवि बिश्नोई या फिरकी त्रिकुटासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. लखनौला विजयासाठी 122 धावांचे आव्हान आहे. 


फिरकी त्रिकूटाने हैदराबादची दाणादाण उडवली - 


कृणाल पांड्या, रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा या फिरकी त्रिकुटापुढे हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. क्रृणाल पांड्याने तीन विकेट घेतल्या. तर अमित मिश्राने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोई याने एक विकेट घेतली. या तिन्ही फंलदाजांनी धावाही रोखल्या. कृणाल पांड्याने चार षटकात अवघ्या 18 धावा खर्च केल्या. तर रवि बिश्नोई याने फक्त 16 धावा दिल्या. अमित मिश्रा याने चार षटकात 23 धावा दिल्या. 


हैदराबादची फलंदाजी ढासळली - 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. मयंक अग्रवाल अवघ्या 8 धावा काढून तंबूत परतला. एडन मार्करम याला खातेही उघडता आले नाही. हॅरी ब्रूक 3, वॉशिंगटन सूंदर 16,आदिल रशीद  4, अमरान मलिक शून्य.. यांना मोठी खेळी करता आली नाही. लखनौच्या गोलंदाजीसमोर फलंदाजींनी नांगी टाकली. 


अब्दुल समद, त्रिपाठी अन् अनमोलचा संघर्ष - 
एकीकडे फंलदाज नांग्या टाकत असताना हैदराबादच्या अब्लुद समद, राहुल त्रिपाठी आणि अनमोलप्रीत सिंह यांनी संघर्ष केला. या तीन फंलदाजांनी धावा केल्यामुळे हैदराबादची लाज वाचली. अनमोलप्रीत याने 26 चेंडूत 31 धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठी याने 41 चेंडूत 34 धावा जोडल्या.  अब्दु समद याने अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यामुळे हैदराबादचा संघ 100 च्या पार केला. अब्लुद समद याने 10 चेंडूत 21 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार लगावले. लखनौची गोलंदाजी इतकी भेदक होती की हैदराबादच्या फंलदाजांना फक्त 20 षटकात तीन षटकार लगावता आले. तर फक्त 10 चौकार त्यांना मारता आले. 


हैदराबादने नाणेफेक जिंकली -


सनरायजर्स हैदाराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ प्रथम गोंलदाजी करणार आहे. एडन मार्करम याचे हैदराबाद संघात पुनरागमन झालेय. त्याने नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. पहिल्याच सामन्यात नाणेफेकीचा कौलही जिंकला आहे. अमित मिश्रा याला लखनौने प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. क्विंटन डि कॉक याला लखनौच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. लखनौचा संघ काइल मायर्स याच्यासोबत गेला आहे. 


खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. मोठी धावसंख्या उभारता येईल. संघातील प्रत्येक खेळाडू चांगल्या स्पिरीटने आणि उर्जेने खेळेल. अनमोलप्रीत सिंह सलामीला येणार आहे, असे नाणेफेकीनंतर एडन मार्करम याने सांगितले.  आजच्या सामन्यात आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणार आहे. मार्क वूड याला ताप असल्यामुळे तो या सामन्याला मुकणार आहे. त्याशिवाय मागील सामन्यात आवेश खान दुखापतग्रस्त झाला होता, तोही या सामन्यात खेळणार नाही, असे राहुलने सांगितले.