RR vs RCB Match Preview: आज (14 मे) आयपीएलमध्ये (IPL 2023) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात यंदाच्या सीझनमधील 60 वा सामना रंगणार आहे. सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. या मोसमातील दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना असेल. याआधी झालेल्या सामन्यात राजस्थाननं 7 गडी राखून विजय मिळवला होता. तसेच, या सामन्यात दोन्ही संघ कोणत्या प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आणि कोणता संघ विजयाला गवसणी घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मॅच प्रेडिक्शन
राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याच्या अंदाजाबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ आयपीएलमध्ये जवळपास बरोबरीत दिसत आहेत. एकूण 28 वेळा आमने-सामने आलेल्या सामन्यांमध्ये आरसीबीनं 14 आणि राजस्थान रॉयल्सनं 12 सामने जिंकले आहेत. त्यानुसार बंगळुरूचं पारडं काहीसं जड असल्याचं दिसून येत आहे.
याशिवाय सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या एकूण 7 सामन्यांपैकी राजस्थाननं 4 आणि आरसीबीनं 3 सामने जिंकले आहेत. ही आकडेवारी पाहता राजस्थान बंगळुरूपेक्षा काहीसा पुढे आहे. तसेच, या मोसमात दोन्ही संघांमध्ये खेळला गेलेला सामना राजस्थाननं जिंकला होता. अशा स्थितीत या सामन्यात घरच्या मैदानावर लक्ष ठेवल्यास राजस्थानच्या विजयाची शक्यता प्रबळ असल्याचं दिसत आहे.
राजस्थान विरुद्ध बंगळुरू हेड टू हेड
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये राजस्थाननं 12 आणि बंगळुरूनं 14 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचा आजचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे, जिथे दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा भिडले आहेत. या सामन्यांमध्ये राजस्थाननं 4 तर बंगळुरूनं 3 सामने जिंकले आहेत.
Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंह स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
जपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
राजस्थान आणि बंगळुरूचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ :
यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा संभाव्य संघ :
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदु हसरंगा, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.