Manish Pandey, IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्लीचे आव्हान संपुष्टात आलेय. घरच्या मैदानार पंजाबने दिल्लाचा ३१ धावांनी पराभव केला. चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.  पंजाबच्या फिरकी गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दिल्लीच्या पराभवानंतर चाहत्यांमध्ये रोष आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषकरुन मनिष पांडे याच्यावर नेटकरी नाराज आहेत. 


मनिष पांडे याच्याकडे आयपीएलचा खूप मोठा अनुभव आहे. असे असतानाही दिल्लीच्या डावाला आकार देण्यात त्याला अपयश आले. खलील अहमदच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मनिष पांडे मैदानात आला.. पण इम्पॅक्ट न पाडता बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. समालोचक कृष्णकांत श्रीकांत यांनीही मनिष पांडेच्या फलंदाजीवर ताशोरे ओढले. ते म्हणाले की, मनिष पांडे हा प्रतिस्पर्धी संघासाठी इम्पॅक्ट प्लेअर आहे. 






एका युजर्सने तर मनिष पांडे याचे करिअर संपल्याचे सांगितले. दिल्लीचा संघ पुढील वर्षी मनिष पांडेला रिलिज करेल.. इतर कोणता संघ त्याला घेईल. असेही वाटत नाही.. असे त्याने ट्वीट केलेय. अन्य एका युजर्सच्या मते मनिष पांडे याने क्रिकेट का खेळतोय.. त्याच्या जागी एखादा रणजीमधील खेळाडू चांगली कामगिरी करेल.. अशाप्रकारे सोशल मीडियावर चाहते आपला रोख व्यक्त करत आहेत. 


दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, पंजाबचा 31 धावांनी विजय
IPL 2023, DC vs PBKS: पंजाबच्या फिरकीच्या जाळ्यात दिल्लीचा संघ अडकला. चांगल्या सरुवातीनंतर दिल्ली विजयापासून दूर राहिली. १६८ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित २० षटकात १३६ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबने दिल्लीचा ३१ धावांनी पराभव केला. डेविड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय एखाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर या दोघांनी सहा विकेट घेतल्या. या पराभवासह दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.