SRH Releases Kane Williamson :  आयपीएल 2023 (IPL 2023) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) आगामी आयपीएलपूर्वी रिलीज केलं आहे. 23 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व संघाना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे पाठवयची होती, त्यात हैदराबादने 12 खेळाडूंना रिलीज केलं असून केनचं नावही त्यात होतं. तर संघाचा कर्णधार असणाऱ्या केनलाच संघाने का रिलीज केलं असाव याचं कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करु... 


आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून खेळलेल्या केन विल्यमसनने त्या हंगामात संघासाठी 13 सामने खेळले आणि 19.64 च्या सरासरीने 216 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 93.51 इतकाच होता. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने 2022 मध्ये 14 पैकी केवळ 6 सामनेच जिंकले होते. ज्यामुळे आयपीएल संपताना संघ गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर राहिला. याशिवाय सनरायझर्स हैदराबादने IPL 2022 च्या मेगा लिलावात केनला तब्बल 14 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. मात्र, तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. या साऱ्या गोष्टींचा विचार करुनच फ्रँचायझीने विल्यमसनला सोडण्याचा निर्णय घेतला असावा. 




12 खेळाडूंना SRH ने केलं रिलीज


केन विल्यमसनसह सनरायजर्स हैदराबादने एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधि म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. तर हैदराबादने रिटेन आणि रिलीज केलेले खेळाडू नेमके कोणते जाणून घेऊ...


सनरायझर्सने रिलीज केलेले खेळाडू


केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमॅरियो शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णू विनोद.


कोणते खेळाडू अजूनही हैदराबादमध्ये


अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि उमरान मलिक.


हे देखील वाचा-