Indian Premier League, Rajat Patidar Ruled Out : फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आरसीबीने आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची दमदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात मुंबईचा आठ विकेटने पराभव केला. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी दमदार फलंदाजी करत आरसीबीला विजय मिळवून दिला होता. पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवणाऱ्या आरसीबीला दुसऱ्या सामन्याआधी मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज रजत पाटीदार दुखापतग्रस्त झाला आहे. यंदाच्या हंगमातून पाटीदार बाहेर गेलाय. हा आरसीबीसाठी मोठा धक्का मानला जातोय. गेल्या हंगमात रजत पाटीदार याने फलंदाजीत महत्वाची भूमिका बजावली होती, त्याने एक शतकही झळकावले होते. यंदाच्या हंगामात पाटीदार दुखापतीमुळे बाहेर गेलाय.  




लखनौविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकले


आयपीएल 2022 मध्ये, रजत पाटीदारने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात आपल्या शानदार शतकाने संघाला विजय मिळवून दिला. तिसऱ्या क्रमांकावर येताना त्याने 54 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 112 धावा केल्या. आरसीबीने हा सामना 14 धावांनी जिंकला.


29 वर्षांचा रजत पाटीदार मूळचा मध्य प्रदेशच्या इंदूरचा आहे.. वयाच्या आठव्या वर्षी तो क्रिकेट अॅकॅडमीत दाखल झाला. 2015-16 च्या रणजी मोसमात रजतनं आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीला सुरुवात केली. तर 2018 मध्ये त्यानं मध्य प्रदेशकडून आपला पहिला टी20 सामना खेळला. 2021 च्या मोसमात बंगलोरकडूनच त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.




 







रजत पाटीदार नाही तर तिसऱ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी? आरसीबीकडे कोणते पर्याय उपलब्ध
मागील आयपीएल हंगामात पाटीदार आरसीबीसाठी सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. त्याने 7 डावात 56 च्या सरासरीने आणि 153 च्या स्ट्राईक रेटने 333 धावा केल्या. पाटीदारने गेल्या मोसमात असारिबीसाठी नंबर-3 वर फलंदाजी केली. या हंगामात असारिबी संघात नसल्यास नंबर-3 वर कोण फलंदाजी करू शकतो, याची चर्चा सुरु आहे. यामध्ये महिपाल लोमरोर याचे नाव सर्वात आघाडीवर आहे.  सुयश प्रभुदेसाई याने गेल्या हंगामात आरसीबीकडून पदार्पण केले होते. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल यालाही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवले जाऊ शकते.  


पाटीदारचे करिअर कसे राहिलेय ?


गेल्या हंगामात रजत पाटीदारने तुफानी फटकेबाजी केली. पाटीदारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 156.25 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडला. पाटीदारने सात सामन्यात 275 धावांचा पाऊस पाडला.  29 वर्षांचा रजत पाटीदार मूळचा मध्य प्रदेशच्या इंदूरचा आहे.. वयाच्या आठव्या वर्षी तो क्रिकेट अॅकॅडमीत दाखल झाला. 2015-16 च्या रणजी मोसमात रजतनं आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीला सुरुवात केली. तर 2018 मध्ये त्यानं मध्य प्रदेशकडून आपला पहिला टी20 सामना खेळला. 2021 च्या मोसमात बंगलोरकडूनच त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.आयपीएल 2021 मध्ये पाटीदारने 4 सामन्यात 71 धावा केल्या होत्या.