IPL 2023 Ravindra Jadeja : इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League) चा 17 वा सामना 12 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळला गेला. चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) झालेल्या या रोमहर्षक सामन्यात राजस्थानने (Rajasthan Royals) चेन्नईचा 3 (Chennai Super Kings) धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकात चेन्नईला सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज होती. मात्र अखेरच्या षटकात चेन्नईला केवळ 17 धावा करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघाने 8 बाद 175 धावा केल्या. विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी धोनीच्या नेतृत्त्वात संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 172 धावा करता आल्या.
जडेजाने टी20 मध्ये घेतल्या 200 विकेट्स
या सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला असला तरी, चेन्नई संघातील रविंद्र जडेजा याने नवा विक्रम रचला आहे. रविंद्र जडेजाने राजस्थानविरुद्ध डावातील नववं षटक टाकलं. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजाने राजस्थानचा फलंदाज देवदत्त पडिक्कलला तंबूत परत पाठवलं. त्यानंतर त्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर त्याने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला एका अप्रतिम चेंडू बोल्ड केलं. राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनला खातंही उघडता आलं नाही. या विकेटसह जडेजाने टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण केल्या आहेत. जडेजाच्या कारकिर्दीतील 296 व्या सामन्यात त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.
T20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला भारतीय
रविंद्र जडेजाची टी20 (T20) क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. 200 विकेट्स घेत त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जडेजाची टी-20 क्रिकेटमधील कामगिरी उत्तम आहे. त्याने टी20 मध्ये 7.55 च्या प्रभावी इकॉनॉमीवर गोलंदाजी केली आहे. याशिवाय त्याचा सर्वोत्तम स्पेल म्हणजे 16 धावांत देत 5 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर जडेजाने धावाही केल्या आहेत. जडेजाने 25.38 च्या सरासरीने 3173 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याच्या नावावर दोन अर्धशतकंही आहेत. यामुळेच जडेजा हा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो.
21 धावा देत घेतले दोन बळी
नवव्या षटकात रविंद्र जडेजाने आधी पडिक्कल आणि नंतर कर्णधार संजू सॅमसनला शून्यावर बाद करून दोन गडी बाद करत मोठं यश मिळवलं. जडेजानं चार षटकांत 21 धावा देत दोन बळी घेतले. तुषार देशपांडे आणि आकाश सिंग यांनी धावा दिल्या पण दोघांनाही प्रत्येकी 2-2 गडी बाद करण्यात यश मिळालं. मोईन अलीनेही एक विकेट आपल्या नावावर केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :