MI vs GT, IPL 2023 Qualifier 2 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये फक्त दोन सामने शिल्लक आहेत. पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) हे दोन्ही संघ अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहेत. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना आज, 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.


अंतिम फेरीच्या तिकीटासाठी झुंज


अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघ मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात विजेच्या संघाचा मुकाबला चेन्नई सुपर किंग्सशी होईल.


आजच्या गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना आणि नरेंद्र मोदी स्टेडिअमबाबतच्या काही रंजक बाबी जाणून घ्या.



  • आयपीएलचा पहिला सामना 2010 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. आतापर्यंत येथे 25 सामने खेळले गेले आहेत.

  • गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने या मैदानावर 62.62 च्या सरासरीने आणि 147.35 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 501 धावा केल्या आहेत.

  • आतापर्यंत आयपीएल सामन्यांमध्ये मुंबईच्या सूर्यकुमार यादव समोर गुजरातच्या राशिद खानची गोलंदाजी फिकी पडल्याचं दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे राशिद खान अद्याप सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये बाद करू शकलेला नाही. 

  • गोलंदाजीत गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वरचढ आहे. शमीने या मैदानावर सर्वाधिक 18 विकेट घेतल्या आहेत.

  • नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी 12 सामने जिंकले आहेत आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी 13 सामने जिंकले आहेत.

  • या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी 12 सामने जिंकले असून नाणेफेक गमावलेल्या संघाने 13 सामने जिंकले आहेत.

  • गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दोन गडी गमावून 227 धावा केल्या होत्या. ही नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

  • मुंबई इंडियन्सचा संघ मागील सहा आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये अजिंक्य आहे. 

  • मुंबई संघाने आयपीएल 2017 मध्ये शेवटचा प्लेऑफ सामना गमावला होता. त्यानंतरच्या आयपीएल प्लेऑफधील सर्व सामने जिंकले आहेत. 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Akash Madhwal Fees : RCB कडून केवळ नेट प्रॅक्टिस, आता मुंबईचा स्ट्राईकर, आकाश मधवालला MI ने किती रुपयात केले होते खरेदी?